आमदारांच्या पत्नीलाही सरकारी खर्चाने विमान प्रवास करणे आता शक्य होणार आहे. तसेच आमदारांच्या स्वीय सचिवांचे वेतन ८ वरून १५ हजार रुपये  करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला.
आमदारांना वर्षभरात ३२ विमान फेऱ्या मोफत मिळतात. आमदारांच्या पत्नीलाही विमान प्रवासाची सुविधा मिळणार असली तरी पत्नीने बरोबर प्रवास केल्यास एका वेळी दोन फेऱ्या करण्यात आल्या हे गृहित धरले जाईल. यामुळे सरकारवरील बोजा वाढणार नाही, असे संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. सध्या आमदारांना रेल्वेत प्रथम वर्ग मोफत प्रवास करता येतो. काही गाडय़ांमध्ये प्रथम वर्ग नसल्याने ही सुविधा आता द्वितीय वातानुकूलितमध्ये उपलब्ध होणार आहे. यामुळे तिजोरीवर तीन कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.