News Flash

पंकज भुजबळांच्या तात्पुरता अटकपूर्व जामिनात शुक्रवारपर्यंत वाढ

नवीन महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी पंकज भुजबळांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट

पंकज भुजबळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांच्या अंतरिम अटकपूर्व जामिनामध्ये मंगळवारी उच्च न्यायालयाने १० जूनपर्यंत वाढ केली. नवीन महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी पंकज भुजबळ यांच्याविरोधातील अजामीनपात्र अटक वॉरंटला स्थगिती देण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावरील सुनावणीवेळी न्यायालयाने त्यांना १० जूनपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे पंकज भुजबळ यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2016 5:40 pm

Web Title: pankaj bhujbals interim bail extended upto 10 june
टॅग : Pankaj Bhujbal
Next Stories
1 फक्त राजकारणातून निवृत्ती समाजकारणातून नाही – गुरुदास कामत
2 आता प्रवेशासाठी चढाओढ
3 कामत काँग्रेसबाहेर
Just Now!
X