20 September 2020

News Flash

पासपोर्ट पडताळणीची प्रक्रिया अधिक सोपी

नोकरी किंवा पर्यटनाच्या निमित्ताने बाहेरगावी जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी पासपोर्ट म्हणजे अनिवार्य गोष्ट असते. पासपोर्ट मिळविण्यासाठी अर्जदारांना अनेक दिव्यांतून पार पडावे लागण्याचा अनुभव काही नवीन नाही.

| July 26, 2014 11:09 am

नोकरी किंवा पर्यटनाच्या निमित्ताने बाहेरगावी जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी पासपोर्ट म्हणजे अनिवार्य गोष्ट असते. पासपोर्ट मिळविण्यासाठी अर्जदारांना अनेक दिव्यांतून पार पडावे लागण्याचा अनुभव काही नवीन नाही. गेल्या काही वर्षात ही प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत करण्याचे प्रयत्न प्रशासनातर्फे सुरू आहेत. आता, या दृष्टीने आणखी एक निर्णय घेण्यात आला आहे. पासपोर्ट काढताना पोलीस व्हेरिफिकेशनच्या प्रक्रियेत वेळ कमी लागावा यासाठी, मुंबई पोलिसांनी ‘पोलीस व्हेरिफिकेशन एसएमएस’ ही नवी सुविधा सुरू केलीय. या सुविधेनुसार पासपोर्ट ऑफिसमधून ज्यावेळी तुमचा फॉर्म व्हेरिफिकेशनसाठी पोलीस स्टेशनमध्ये येईल, त्यावेळी तुम्हाला एसएमएस येईल. त्यामध्ये पोलीस व्हेरिफिकेशनसाठीची तारीख आणि वेळ या एसएमएसमधून तुम्हाला कळवली जाईल. व्हेरिफिकेशन पूर्ण होताच तुमचा फॉर्म पासपोर्ट ऑफिसला कोणत्या तारखेला पाठवला गेला आणि किती वाजता हे सुद्धा एसएमएसमधून कळेल आणि हे सगळे ऑनलाईनसुद्धा चेक करता येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2014 11:09 am

Web Title: passport procedure will be more simple now
टॅग Passport
Next Stories
1 भुजबळांवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
2 असुरक्षित नगरसेविकांचा आमदाराविरोधात हल्लाबोल
3 प्राथमिक शिक्षकांच्या पगारात फक्त शंभर रुपयाने वाढ
Just Now!
X