News Flash

निरमाच्या जाहिरातीमुळे अक्षय कुमार वादात, शिवप्रेमी संतापले

अभिनेता अक्षय कुमारने माफी मागावी अशी मागणी शिवप्रेमी करत आहेत

निरमा पावडरच्या एका जाहिरातीमुळे अभिनेता अक्षय कुमार हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. निरमाची ही जाहिरात करुन अक्षय कुमारने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे असा आरोप आता त्याच्यावर होतो आहे. निरमाच्या जाहिरातीत अक्षय कुमार आणि इतर कलाकारांना मावळ्यांच्या वेशात दाखवण्यात आलं आहे. या जाहिरातीमधून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यात येत असून याप्रकरणी अभिनेता अक्षय कुमारने माफी मागावी अशी मागणी आता शिवप्रेमी करत आहेत.

काय आहे जाहिरात?

निरमा पावडरच्या या जाहिरातीत अक्षय कुमार आणि इतर मावळे लढाई करुन दरबारात परतलेले असतात. त्यावेळी सुवासिनी त्यांचे औक्षण करतात. एक महिला मात्र त्यांच्या युद्धात मळलेल्या, खराब झालेल्या कपड्यांवर भाष्य करते आणि हे कपडे तर आम्हालाच धुवावे लागतील असे म्हणते. ज्यानंतर अक्षय कुमार म्हणतो, ” महाराज की सेना दुश्मनोंको धोना जानती हैं और अपने कपडे भी!” आणि त्यानंतर अक्षय कुमार आणि त्याच्यासह सगळे मावळे कपडे धुताना दाखवण्यात आले आहेत. मात्र हा प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा आहे या प्रकरणी अक्षय कुमारने माफी मागावी अशी मागणी आता होऊ लागली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2020 10:38 pm

Web Title: people want apology from actor akshay kumar for his nirma advertise scj 81
Next Stories
1 JNU Violence : अनुराग कश्यपची ट्विटरवरुन थेट आंदोलनात उडी, म्हणाला…
2 नाट्यगृहांमध्ये जॅमर हवा की नको? संकर्षण कऱ्हाडेने दिले स्पष्ट उत्तर
3 सुपरहिरोंचा सुपर रेकॉर्ड, एकट्या भारतात विकली ‘इतकी’ लाख तिकिटे
Just Now!
X