27 January 2020

News Flash

Pranab Mukherjee at RSS Event : प्रणवदा आज लाखो काँग्रेस कार्यकर्ते दुखावले – आनंद शर्मा

प्रणव दा, आज तुम्हाला नागपूर संघ मुख्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावरपाहून लाखो काँग्रेस कार्यकर्त्यांना दु:ख झाले आहे असे आनंद शर्मा यांनी म्हटले आहे.

या महिन्याच्या प्रारंभी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. मुखर्जींच्या या कार्यक्रमानंतर त्यांचे गृहराज्य पश्चिम बंगालमधून संघात सहभागी होण्यासाठी इच्छुकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

प्रणवदा आज तुम्हाला नागपूर संघ मुख्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावरपाहून लाखो काँग्रेस कार्यकर्त्यांना दु:ख झाले आहे. भारतीय प्रजासत्ताकाची मुल्ये, बुहतत्ववाद आणि विविधतेवर विश्वास असणाऱ्यांना आज वेदना झाल्या आहेत असे टि्वट काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी केले आहे.

प्रणव मुखर्जी यांनी आरएसएसच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारल्यापासून त्यांच्यावर काँग्रेसमधून टीका होत आहे. या टीकाकारांमध्ये आता आनंद शर्मांचा समावेश झाला आहे. प्रणव मुखर्जींवर त्यांच्या स्वत:च्या मुलीने टीका केली आहे. ज्यांना ऐकण्याची, आत्मसात करुन बदलण्याची इच्छा असते त्यांच्याशी चर्चा केली जाते. आरएसएस आपल्या मुख्य उद्देशापासून केव्हाच दूर गेली आहे असे आनंद शर्मा यांनी म्हटले आहे.

तुम्ही भाजपवाल्यांना खोट्या बातम्या आणि अफवा पसरवण्याची संधी देत आहात असं शर्मिष्ठा मुखर्जी यांनी म्हटलं आहे. काल रात्री सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार आणि काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी सुद्धा प्रणवदा मी तुमच्याकडून ही अपेक्षा केली नव्हती असे टि्वट केले.

First Published on June 7, 2018 7:42 pm

Web Title: pranab mukherjee anand sharma rss event nagpur
Next Stories
1 Pranab Mukherjee at RSS Event : पाहा नागपूर संघ मुख्यालयातील LIVE कार्यक्रम
2 Pranab Mukherjee at RSS Event: देशाबाबत प्रत्येकाने निष्ठा बाळगणे हीच देशभक्ती
3 FB Live बुलेटीन: उद्या दहावीचा निकाल, सेना स्वबळावरच लढणार यासह महत्त्वाच्या बातम्या
Just Now!
X