महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस. वक्तृत्वाबरोबरच आपल्या रोखठोक भूमिकेमुळे चर्चेत राहणाऱ्या राज ठाकरे यांना लोकांचा मतपेटीतून फारसा पाठिंबा मिळत नाही. या विषयावर बोलत असताना राज ठाकरे यांनीही आपल्या मनातील खंत व्यक्त केली होती. विकासाचे प्रश्न आणि राजकारण यावर बोलत असताना राज ठाकरे यांनी लोकांच्या विकासाच्या राजकारणाकडे बघण्याच्या दृष्टिकोनाबद्दल भाष्य केलं होतं. काय म्हणाले होते राज ठाकरे…? ऐका त्यांच्याच शब्दात…

Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray in nagpur
फडणवीस यांची उध्दव ठाकरेंवर टीका; म्हणाले, “त्यांना तोंडाच्या…”
Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
raj thackray mns latest news
मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम
sharad pawar latest news
राजकारणात महिलांना पतीच्या तालावर नाचावं लागतं? प्रश्न विचारताच शरद पवार म्हणाले, “फक्त पुरुषांतच कर्तृत्व…!”

‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या वेबिनारमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणावर महत्त्वपूर्ण भाष्य केलं. यावेळी त्यांनी मनसेचं केलेलं विकासाचं राजकारण आणि न मिळणारा लोकाश्रय याबद्दल भूमिका मांडली होती. ही भूमिका मांडत असताना त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचंही उदाहरण दिलं होतं.