News Flash

आदिवासीबहुल आठ जिल्ह्यांत क व ड पदांसाठी सुधारित आरक्षण

जिल्ह्यांमध्ये गट क व गट ड संवर्गातील सरळ सेवेच्या भरतीसाठी सुधारित आरक्षण निश्चित करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला

आदिवासीबहुल आठ जिल्ह्यांत क व ड पदांसाठी सुधारित आरक्षण मुंबई: राज्यातील अनुसूचित जमातीची लोकसंख्या अधिक असलेल्या ८ जिल्ह्यांमध्ये गट क व गट ड संवर्गातील सरळ सेवेच्या भरतीसाठी सुधारित आरक्षण निश्चित करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानुसार पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, रायगड या ८ जिल्ह्यांमधील आरक्षण जिल्हा व प्रवर्गनिहाय पुढीलप्रमाणे –

१) पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या ४ जिल्ह्यांमध्ये अनु.जाती १० टक्के, अनु.जमाती २२ टक्के,  विजा-अ ३ टक्के, भज-ब २.५ टक्के, भज-क ३.५ टक्के, भज-ड २ टक्के, विमाप्र २ टक्के, इमाव १५ टक्के, ईडब्ल्यूएस १० टक्के आणि खुला ३० टक्के,

२) यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनु.जाती १२ टक्के, अनु.जमाती १४ टक्के, विजा-अ ३ टक्के, भज-ब २.५ टक्के, भज-क ३.५ टक्के, भज-ड २ टक्के, विमाप्र २ टक्के, इमाव १७ टक्के, ईडब्ल्यूएस १० टक्के आणि खुला ३४ टक्के,

३) चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनु.जाती १३ टक्के, अनु.जमाती १५ टक्के , विजा-अ ३ टक्के, भज-ब २.५ टक्के,          भज-क ३.५ टक्के, भज-ड २ टक्के, विमाप्र २ टक्के, इमाव १९ टक्के, ईडब्ल्यूएस १० टक्के आणि खुला ३० टक्के,

४) गडचिरोली जिल्ह्यामध्ये अनु.जाती १२ टक्के, अनु.जमाती २४ टक्के, विजा-अ ३ टक्के , भज-ब २.५ टक्के, भज-क ३.५ टक्के, भज-ड २ टक्के, विमाप्र २ टक्के, इमाव १७ टक्के, ईडब्ल्यूएस १० टक्के आणि खुला २४ टक्के.

५) रायगड जिल्ह्यामध्ये अनु.जाती १२ टक्के, अनु.जमाती ९ टक्के, विजा-अ ३ टक्के, भज-ब २.५ टक्के,    भज-क ३.५ टक्के, भज-ड २ टक्के, विमाप्र २ टक्के, इमाव १९ टक्के, ईडब्ल्यूएस १० टक्के आणि खुला ३७ टक्के.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2021 12:28 am

Web Title: revised reservation for c and d posts in eight tribal dominated districts akp 94
Next Stories
1 ‘माझी वसुंधरा इकोफ्रेंडली घरगुती गणेशोत्सव स्पर्धे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
2 कोकणासाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा
3 राष्ट्रीयीकृत बँकेच्या अध्यक्षांची औरंगाबाद येथे आज परिषद
Just Now!
X