मुंबई : सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) शनिवारी अभिनेत्री रिया चक्र वर्तीचा भाऊ शोविकची दिवसभर चौकशी के ली. शोविक आणि  सुशांतसिंह राजपूत यांनी दोन कंपन्या सुरू केल्या होत्या. या कं पन्यांमध्ये दोघे संचालकपदावर होते.

शुक्रवारी ईडी अधिकाऱ्यांनी रिया आणि शौविककडे चौकशी केली होती. शनिवारी उर्वरित चौकशीसाठी शोविकला बोलावण्यात आले होते. त्यानुसार सकाळी अकराच्या सुमारास शोविक ईडीच्या मुंबई येथील विभागीय कार्यालयात हजर झाला. ईडीने सुशांतच्या चार बँक खात्यांच्या घडलेल्या प्रत्येक व्यवहारांची बारकाईने तपासणी के ली. तसेच सुशांतने कु टुंबियांच्या नावे सुरू के लेल्या नियत ठेव/मुदत ठेव (फिक्स डिपॉझीट) खात्यांचेही तपशील तपासले. संचालक असलेल्या तीन कं पन्यांची निर्मिती, त्यातील गुंतवणूक, कं पन्यांचा व्यापार, नफा-तोटा आदी बाबीही तपासल्या. त्याआधारे ईडीने रिया आणि तिच्या कु टुंबियांकडे विशेषत: भाऊ शौविक आणि वडील इंद्रजीत यांची चौकशी सुरू केली.

सुशांतसोबत वांद्रे येथील निवासस्थानी वास्तव्य करणाऱ्या सिद्धार्थ पिठानी यालाही ईडीने समन्स जारी करून चौकशीसाठी हजर राहाण्याची सूचना के ली आहे.  त्याच्या सोबत ईडी सुशांतची व्यवस्थापक श्रुती मोदीकडेही नव्याने चौकशी करणार आहे.

सिंग कु टुंबाचे वकील विकास सिंग यांनी रियाचे उत्पन्न, मालमत्ता किं वा गुंतवणूक मिळकत परतावा विवरणाशी जुळत नाही, असा आरोप के ला आहे.

दिशा सालीयन  मित्र परिवारासह पार्टी करतानाची ध्वनिचित्रफीत शनिवारी माध्यमांवर आली. ही चित्रफित ८ जूनच्या संध्याकाळी दिशाने चित्रीत के ली आणि आपल्या मित्र परिवाराला समाजमाध्यमांवरून पाठवली, असा दावा मुंबईच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने के ला. मात्र या ध्वनिचित्रफितीवर कु ठेही तारिख नमूद नाही. बिहार पोलिसांनी आठवडाभरात  घडलेल्या दिशा आणि सुशांतच्या मृत्यूत समान धागा आहे, असा संशय व्यक्त के ला होता.

सुशांतच्या हस्ताक्षरातील मजकूर?

रियाच्यावतीने तिचे वकील अ‍ॅड. सतीश मानेशिंदे यांनी शनिवारी एक मजकूर माध्यमांसमोर आणला.  हा मजकू र सुशांतच्या हस्ताक्षरातील आहे, असा दावा करण्यात आला. चक्र वर्ती कु टुंब माझ्या आुयष्यात आले त्याबद्दल मी कृ तज्ञ/आभारी आहे, असे नमूद आहे. या मजकु रातील लीलू म्हणजे शोविक, बेबू म्हणजे रिया, सर म्हणजे रियाचे वडील इंद्रजीत आणि मॅम म्हणजे रियाची आई, असे स्पष्ट करण्यात आले.

सुशांतसिंहच्या आत्महत्येवरून राजकारण -देशमुख

नागपूर :  सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येवरून देशात राजकारण सुरू आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून योग्य दिशेने केला जात आहे. त्यानंतरही काही जण प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची विनंती करीत असून त्याकरिता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर ११ ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्र सरकार पुढील निर्णय घेईल. तोपर्यंत तपास मुंबई पोलीसच करतील, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

तपासात प्रगती झाल्याचा पोलीस अधिकाऱ्याचा दावा

पाटणा : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी तपासात प्रगती झाली असल्याचा दावा बिहारचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांनी केला आहे. पाटण्यात प्राथमिक माहिती अहवाल दाखल झाल्यानंतर तिवारी हे सुशांतच्या मृत्यूप्रकरणी तपासासाठी मुंबईत आले होते. तिवारी यांना मुंबई पालिका अधिकाऱ्यांनी काही काळ विलगीकरणात ठेवले होते. पाटणा येथे ते शुक्रवारी परत आले असून तपासात नेमकी काय महत्त्वाची माहिती मिळाली हे सांगण्यास तिवारी यांनी नकार दिला.