News Flash

दिवसाढवळया घरात घुसून लुटमार

ठाणे येथील मुंब्रा आणि श्रीनगर भागात मंगळवारी भरदिवसा चोरटय़ांनी घरात घुसून सुमारे दीड लाखांचे दागिने लुटून नेल्याचा प्रकार घडला असून श्रीनगर येथील घटनेत पाणी पिण्याच्या

| November 29, 2012 04:05 am

ठाणे येथील मुंब्रा आणि श्रीनगर भागात मंगळवारी भरदिवसा चोरटय़ांनी घरात घुसून सुमारे दीड लाखांचे दागिने लुटून नेल्याचा प्रकार घडला असून श्रीनगर येथील घटनेत पाणी पिण्याच्या बाहाण्याने घरात शिरुन चोरटय़ांनी चाकूचा धाक दाखवून दागिने लुटले. या दोन्ही घटनांमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
दिवा पुर्व भागातील दिगंबर या इमारतीत सुमन रघुनाथ (६६) राहतात. मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अनोळखी महिला आणि पुरुष त्यांच्या घरात शिरले. त्यानंतर त्यांनी एक लाख पाच हजारांचे दागिने लुटून नेले. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किसननगर येथील ओमशक्ती या इमारतीत रुपाली महेश पाटील (२३) राहतात. मंगळवारी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास २५ ते ३० वयोगटातील अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरी आला. शेठ आहेत का, अशी विचारणा करीत पाणी पिण्याचा बाहाणा करून तो घरात शिरला. त्यानंतर त्याने घराचा दरवाजा आणि खिडकी बंद करून मुलाच्या गळ्याला चाकू लावत सुमारे ४८ हजारांचे सोन्याचे दागिने लुटून नेले. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2012 4:05 am

Web Title: robbery in house in day time
टॅग : Robbery,Thane
Next Stories
1 गिडवाणी यांच्या निधनाने ‘आदर्श’ तपास डळमळणार?
2 पोयसर नदीच्या रुंदीकरणासाठी जागा देण्यास चर्च व शाळेचा स्पष्ट नकार
3 आणखी एका अटकेने वादंग
Just Now!
X