परिवहन विभागात लवकरच ७६ ‘इंटरसेप्टर व्हेईकल’

मुंबई: वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन चालकांच्या बेशिस्तिला लगाम घालण्यासाठी परिवहन विभाग आपल्या ताफ्यात ७६ अत्याधुनिक ‘इंटरसेप्टर व्हेईकल’ दाखल करणार आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. यामध्ये स्पीडगन, सीसीटीव्हींसह अन्य यंत्रणा आहे.

महाराष्ट्रात अपघाती मृत्यूंचे प्रमाण मोठे आहे. अपघातांमागे वाहनचालकांची बेशिस्त हे प्रमुख कारण आहे. महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करून वाहने चालविली जातात. वेगमर्यादेच्या उल्लंघनामुळे गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात. अनेक वाहनचालक मद्यपान करून वाहने चालवितात. त्यामुळे गंभीर स्वरूपाच्या अपघाताना निमंत्रण मिळते. महामार्ग असो वा अन्य रस्ते वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कठोर कारवाईसाठी परिवहन विभागाकडे फक्त वायुवेग पथक आहेत. साधारण ५० आरटीओ आणि डेप्युटी आरटीओकडे मिळून ७६ वायुवेग पथके असून प्रत्येक पथकात दोन ते तीन कर्मचारी आहेत. परंतु अशा पद्धतीने कारवाई करताना मर्यादा येतात.

वेगाने आणि बेदरकारपणे वाहन चालवणे, मद्यपान करून वाहन चालवणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी आणि मालवाहतूक करणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे, सिग्नल नियम मोडणे, हेल्मेटविना दुचाकी चालवणे या बाबतीत वायुवेग पथकाकडूनही कारवाई के ली जाते. या पथकाकडे फक्त साधी वाहने आहेत. अन्य आधुनिक यंत्रणा नाही. त्यामुळे आरटीओकडे येणाऱ्या इंटरसेप्टर वाहनात लेझर तंत्रज्ञानावर आधारित स्पीडगन असेल.

या नव्या वाहनात स्पीडगन ठेवण्याची सुविधा (ट्रायपॉड) आहे. त्यामुळे ऊन-वारा, पावसाचा परिणाम पोलिसांच्या स्पीडगन कारवाईवर होणार नाही. याशिवाय सीसीटीव्ही,  ब्रीद अ‍ॅनलायझर, इ-चलान यंत्रणा आहे.

चालक परवाने निलंबित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिवहन विभागाने २०१९ मध्ये विविध गुन्ह्य़ांत ३७ हजार ४८३ चालकांचे लायसन्स निलंबित केले आहे. यामध्ये सर्वाधिक कारवाई वाहन चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्यांवर केली आहे. अशा १४ हजार ६३५ जणांचे लायसन्स निलंबित के ले आहे. २०२० मध्ये मात्र वेगवेगळ्या गुन्ह्य़ात के लेल्या एकू ण कारवाई वाढ झाली आहे. जवळपास ३९ हजार ४९९ चालकांचे लायसन्स निलंबित करण्यात आले असून यामध्ये १२,१७० वाहन चालकांवर सिटबेल्ट न लावण्याविरोधात कारवाई केली आहे.