उत्तर भारतीय ओबीसी समाज आणि अनुसूचित जाती-जमातींमधील प्रमुख जातींना आरक्षण दिले गेले पाहिजे अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. संजय निरुपम यांच्यासह एक प्रतिनिधी मंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेटले त्यावेळी ही मागणी करण्यात आली. या भेटीनंतर निरुपम आगे बढो च्या घोषणाही देण्यात आल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर भारतीय ओबीसी समाज जसे कुर्मी, कोइरी, यादव, पाल, कनौजिया, चौरासिया, मौर्य, विश्वकर्मा या जातीचा ओबीसी समाज महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे. मुंबईतही अनेकांचे गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य आहे. त्यांना महाराष्ट्रात आरक्षण मिळाले पाहिजे अशीही मागणी निरुपम यांनी केली आहे.

काय मागण्या करण्यात आल्या?
उत्तर भारतीय ओबीसी समाजाला महाराष्ट्रात ओबीसी समाज म्हणून ओळख मिळावी

ओबीसी, एससी आणि एसटी समाजाच्या लोकांना जात प्रमाणपत्र देताना डोमेसाइल प्रमाणपत्र देण्याची अट ठेवण्यात यावी

जात प्रमाणपत्रासाठी पुरावे सादर करण्याची पूर्वीची प्रथा रद्द करावी आणि राज्यातले निवासी असल्याचे प्रमाणपत्र मागावे

उत्तर भारतीय ओबीसींना महाराष्ट्रातील ओबीसी म्हणून ओळख मिळावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे. जात प्रमाणपत्रासाठी पुरावे सादर करण्यासाठी १९५५ किंवा १९६५ ची पद्धत रद्द करावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली. या संदर्भातली लेखी मागणी करा त्यानंतर त्यावर विचार केला जाइल असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

 

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay nirupam and mumbai congress demands quota for north indians
First published on: 18-09-2018 at 17:00 IST