‘टीआरपी’ प्रकरणात संघटनांच्या कायदेशीर भूमिकेवर टीका

मुंबई : शाहरूख, सलमान, आमिर खान, अजय देवगण, आदित्य चोप्रा, करण जोहर, फरहान अख्तरसारखे ३८ निर्माते आणि निर्मात्यांच्या संघटनांनी बेजबाबदार वृत्तांकन करणाऱ्या वृत्तवाहिन्यांविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर बॉलीवूडमधील कलाकार-दिग्दर्शक यांच्याकडून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे.

गेले  कित्येक महिने सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावर बॉलीवूडमधील आघाडीच्या फळीने पहिल्यांदाच कायदेशीर पाऊल उचलत एकत्रित मौन सोडले आहे. मात्र त्यांची ही भूमिका म्हणजे वरातीमागून घोडे असल्याची टीकाही सुरू झाली आहे. बॉलीवूडमधील काही मंडळींनी वृत्तवाहिन्यांविरोधात घेतलेली ही भूमिका अत्यंत उशिराची आणि थंडपणाची आहे, असे ट्वीट करत दिग्दर्शक रामगोपाल वर्माने आरोपाचे पहिले नमन सुरू के ले आहे. या सगळ्यांनी एकत्रित येऊन याचिका करणे हे म्हणजे शाळेतल्या मुलांनी ‘बघा बघा.. बाई तो अर्णब आम्हाला शिव्या देतो आहे,’ अशा बालिश पद्धतीने तक्रार करण्यासारखे आहे, अशी टीकाही रामगोपाल वर्माने के ली आहे. तर या वादाला सुरुवातीपासूनच तडका देण्याचे काम करणाऱ्या कं गनानेही पुन्हा एकदा बॉलीवूडला ‘गटार’ ही उपाधी देत त्यांचा उद्धार के ला आहे. बॉलीवूड हे नशा करणाऱ्यांचे, फसवणूक करणाऱ्यांचे, घराणेशाहीचा उदो उदो करणाऱ्यांचे गटार आहे आणि हे गटार साफ करण्यापेक्षा त्यांनी याचिका दाखल करत समर्थन के ले असल्याची टीका कं गनाने के ली आहे. इथवरच न थांबता आता माझ्यावरही खटला दाखल करा, मी जिवंत असेपर्यंत तुमचे पितळ उघडे पाडत राहणार, असा इशाराही तिने दिला आहे.

एकीकडे रामगोपाल वर्मा आणि कं गनासारखे लोक आहेत, तर दुसरीकडे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी नवीनच मुद्दा उपस्थित के ला. ‘भारताची संस्कृती, कला, संगीत, भाषा, सामाजिक रचना सगळे बिघडवणाऱ्या बॉलीवूडवर जनता खटला दाखल करू शके ल का,’ असे ट्वीट त्यांनी के ले. त्यांच्या या ट्वीटवर त्यांच्याच चित्रपटातून काम के लेल्या अभिनेता निखिल द्विवेदी याने गमतीशीर उत्तर देत त्यांना गप्प के ले आहे. ‘सर शांत व्हा. ‘हेट स्टोरी’सारखा चित्रपट आपणच मिळून के ला होता,’ अशी आठवण करून देत अप्रत्यक्षरीत्या आपणही या पापात सहभागी असल्याचा निर्देश निखिलने के ला आहे. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणानंतर सुरू झालेल्या वादंग आणि तपासामुळे बॉलीवूडमधील अनेक चुकीच्या गोष्टष्टी चव्हाटय़ावर आल्या आहेत. मात्र याप्रकरणी संपूर्ण बॉलीवूडमधील लोक व्यसनी आणि चारित्र्यहीन असल्याचे चित्र वृत्तवाहिन्यांकडून रंगवले जात असल्याची तक्रार या निर्मात्यांनी आपल्या याचिके त के ली आहे. या याचिके च्या निमित्ताने पहिल्यांदाच बॉलीवूडमधील कलाकार बोलते झाले आहेत.

सलमाननेही निशाणा साधला

‘बिग बॉस’च्या चौदाव्या पर्वात ‘वीकें ड का वार’ या पहिल्याच भागात आलेल्या सलमान खानने घरातील सदस्यांना चांगलेच धारेवर धरले. आणि या सदस्यांना खडेबोल सुनावतानाच सलमानने टीआरपीसाठी काहीही करणाऱ्या वाहिन्यांवरही निशाणा साधला. ‘बिग बॉस’च्या घरात असाल किं वा इतर कोणत्याही शोमध्ये तुम्हाला योग्य तऱ्हेने आणि प्रामाणिकपणेच खेळले पाहिजे. लोकप्रियता मिळविण्यासाठी खोटे बोलणे, दुसऱ्यावर आरडाओरडा करणे असे प्रकार करून टीआरपी वाढणार नाही, लोक तुमची वाहिनी बंद करतील, असे अप्रत्यक्षरीत्या सलमानने सुनावले.