पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महालक्ष्मी येथील सभेनंतर काही तासांतच शिवसेनेने गांधीगिरी सुरु केली आहे. मोदींनी स्वच्छ भारत मोहीम सुरू केली असल्यामुळे मुंबईच्या सभेनंतर लोकांना मैदान स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले होते. मात्र भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी सभास्थळीच कचरा केला होता. त्यानंतर आज सकाळी शिवसेनेने स्वच्छता मोहीम राबवून भाजपने केलेला कचरा साफ केला. त्यामुळे शिवसेनेने भाजपवर कुरघोडी केल्याचे बोलले जात आहे.
भाजपचे कार्यकर्ते त्यांच्या प्रमुख नेत्याचे आवाहन पाळत नाहीत तर मग लोकांचं काय ऐकणार अशी कुरघोडीही यावेळी शिवसैनिकांनी केली.
संग्रहित लेख, दिनांक 5th Oct 2014 रोजी प्रकाशित
शिवसैनिकांची गांधीगिरी; मोदी रॅलीच्या ठिकाणी केली सफाई
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महालक्ष्मी येथील सभेनंतर काही तासांतच शिवसेनेने गांधीगिरी सुरु केली आहे.

First published on: 05-10-2014 at 02:27 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena workers clean mahalaxmi race course after modi rally