करोनाग्रस्तांची यादी जाहीर होताच कर्मचारी गैरहजर; बस फेऱ्या ३० टक्के  कमी

मुंबई : करोनाग्रस्त एसटी कर्मचाऱ्यांची यादी सोमवारी समाजमाध्यमावर फिरताच मुंबईसह अन्य तीन आगारातील कर्मचाऱ्यांची झोपच उडाली. त्यामुळे मंगळवारी अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुटणाऱ्या बस फेऱ्यांवर परिणाम झाला. बस फे ऱ्या ३० टक्के  कमी झाल्याने प्रवाशांचे हाल झाले.

एसटी महामंडळाकडून मुंबई महानगर परिसरात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बस चालवल्या जातात. दररोज ५०० ते ६०० पर्यंत बसगाडय़ा चालवताना यातून ५० हजारपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत आहेत. मात्र मंगळवारी या प्रवाशांचे काही प्रमाणात हाल झाले. सध्या करोना रुग्णांमध्ये एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश असून मुंबई विभागातील ४९ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. यामध्ये मुंबई सेन्ट्रल, परळ, कु र्ला नेहरूनगर, पनवेल आगारातील कर्मचारी आहेत. मात्र समाजमाध्यमावर ४९ करोनाबाधित कर्मचाऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली आणि एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या भ्रमणध्वनीवरही यादी आल्याने एकच तारांबळ उडाली. या आगारात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली आणि मंगळवारी अनेकांनी दांडीच मारली.

त्यामुळे आधीच करोनाच्या धास्तीने अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती असतानाच या यादीने तारांबळ उडाली व गैरहजर कर्मचाऱ्यांची संख्या वाढली. दररोज होणाऱ्या बसफे ऱ्यांमध्ये या चार आगारातून ३० टक्के  फे ऱ्या कमी झाल्या. त्याचा फटका सकाळी गर्दीच्या वेळी प्रवास करणाऱ्या अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना बसला. गाडय़ाच उपलब्ध होत नसल्याने बराच वेळ ताटकळत राहावे लागले. त्यामुळे कार्यालय गाठण्यासही काहींना उशीर झाला.

करोनाबाधित कर्मचाऱ्यांची यादी समोर आल्याने त्यांच्याशी संपर्कात आल्याच्या धास्तीने काही कर्मचाऱ्यांनी घरी राहणे पसंत के ले, तर काहींनी गावचा रस्ता धरल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दक्षता घेण्याचे आदेश

समाजमाध्यमावर प्रसारित होत असलेल्या करोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या यादीवर एका विभाग नियंत्रकाची सहीदेखील आहे. त्यामुळे ही यादी नेमकी कशी बाहेर पडली,याचा तपास एसटी महामंडळाकडून के ला जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. यापुढे माहिती देताना करोनाबाधित रुग्णाच्या नावाचा उल्लेख होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना देण्यात आले आहेत.