सेना स्वबळावरच ; सुभाष देसाईंचे स्पष्टीकरण

लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर दिसू लागल्याने आता भाजपला युतीचा व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पुळका आला आहे. मागील सहा महिन्यांपासून भाजपाची भाषा बदलू लागली आहे. शिवसेनेला गोंजारण्याचा भाजपचा प्रयत्न असून उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे शिवसेना यापुढे स्वबळावरच लढणार असून राज्यात शिवसेनेचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शनिवारी झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात केला.

शिवसेनेच्या माध्यमातून जी कामे केली आहेत जनतेपर्यंत पोहोचविणे ही आपली जबाबदारी आहे.

महिलांवर उपनगरीय रेल्वेमध्ये होणारे हल्ले रोखण्यासाठी आता शिवसेना दक्षता पथक नेमणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली.

राणेंना सहा वर्षे हिंदी व इंग्रजी शिकायला लागतील!

शिवसेनेच्या मार्गात ज्यांनी अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न केले, त्यांची अवस्था आता केविलवाणी झाली आहे. छगन भुजबळ तुरुंगात आहेत, नारायण राणे महाराष्ट्रातून तडीपार झालेत आणि गणेश नाईक घरी बसलेत, अशी खरमरीत टीका देसाई यांनी केली. शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्या राणेंना महाराष्ट्रातून हद्दपार व्हावे लागले आहे. त्यांना दिल्लीत सहा वर्षे िहदी व इंग्रजी शिकायला लागतील असा टोला त्यांनी राणेंना लगावला.