News Flash

टोफेलमधून दहा भारतीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

यात मुंबई, ठाणे, पुण्यातील प्रत्येकी एका विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

‘टोफेल’ परीक्षेत अव्वल कामगिरी करणाऱ्या भारतातील दहा विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाकरिता तब्बल ७० हजार अमेरिकी डॉलर्सची शिष्यवृत्ती देऊ केली आहे. यात मुंबई, ठाणे, पुण्यातील प्रत्येकी एका विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
एज्युकेशन टेस्टिंग सव्‍‌र्हिसच्या वतीने टोफेल ही परीक्षा घेतली जाते. परदेशात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषेची चाचणी या परिक्षेद्वारे केली जाते. या परीक्षेच्या माध्यमातून १३० देशांमधील तब्बल नऊ हजार शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळण्याचा मार्ग खुला होतो. टोफेलच्या कार्यकारी संचालक जेनिफर ब्राऊन यांनी शिष्यवृत्तीकरिता निवड झालेल्या १० विद्यार्थ्यांची नावे जाहीर केली. गेल्या चार वर्षांत ३,१०,००० अमेरिकी डॉलर्सची शिष्यवृत्ती भारतीय विद्यार्थ्यांना बहाल करण्यात आली आहे. पूर्वी बेलूर या मुंबईच्या, अझालिया इराणी या पुण्याच्या, ग्रिश्मा जेना या ठाण्याच्या मुलींचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2015 12:27 am

Web Title: ten indian students gets scholarship in toefl
टॅग : Scholarship
Next Stories
1 ‘राइट टू पी’च्या कार्यकर्त्यांचा पालिका अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा अनोखा उपक्रम
2 गरीबांसाठी असलेल्या योजनेचा लाभ मध्यमवर्गीयांना
3 मुंबईतील २६/११च्या खटल्यात डेव्हिड हेडलीही आरोपी, कोर्टाकडून समन्स जारी
Just Now!
X