कालमर्यादा ओलांडल्यानंतर पुन्हा वाढ; दिवा स्थानकांतही थांबा मिळणार

तांत्रिक अडचणी,, स्थानिकांचा विरोध आणि निधीच्या कमतरतेमुळे खीळ बसलेल्या ठाणे-दिवा पाचवी-सहावी माíगकेला वेग येणार आहे. या प्रकल्पाची कालमर्यादा पूर्वीच ओलांडली असताना आता नव्याने ठरवलेली डिसेंबर २०१७ ही कालमर्यादा गाठण्यासाठी मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाकडून प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे उपनगरीय वाहतूक अधिक सुरळीत होणार असल्याचा दावा केला जात आहे.

मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाच्या दुसऱ्या टप्प्यातील दिवा-ठाणे पाचव्या-सहाव्या माíगकेचा प्रकल्प ठाण्यापुढील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र या दोन स्थानकांदरम्यान जलद मार्गावर पारसिक बोगदा असल्याने जलद मार्गाच्या बाजूने दोन नव्या माíगका टाकणे शक्य नव्हते. त्यामुळे धिम्या मार्गाच्या बाजूने या दोन नव्या माíगकांचे काम सुरू आहे. सुरुवातीला हा प्रकल्प २०१५ पर्यंत पूर्ण होईल, असा दावा केला जात होता. मात्र या कामात स्थानिक आमदारांसह स्थानिकांनी अडथळा निर्माण केला होता. तसेच या टप्प्यातील काही झाडे तोडावी लागणार असल्याने प्रचंड विरोध करण्यात आला. त्यामुळे दोन नवे बोगदे बांधण्याचा निर्णय पुढे आला. मात्र यात निधीच्या कमतरतेमुळे हा प्रकल्प रखडला होता. मात्र रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी एमयूटीपी-२साठी १४२२ कोटी रुपये मंजूर केल्यानंतर या कामांना वेग आला आहे. आता हा प्रकल्प पूर्ण करण्याची कालमर्यादा डिसेंबर २०१७ अशी निश्चित करण्यात आली आहे.

डीसी-एसी परिवर्तनामुळे १० कोटींची बचत

डीसी-एसी परिवर्तनाचे काम पूर्ण झाल्याने रेल्वेच्या विजेच्या बिलात प्रतिदिनी १० कोटी रुपयांची बचत होणार आहे. त्यामुळे वर्षभरात मध्य रेल्वेची मोठय़ा प्रमाणात बचत होणार असल्याचे सांगितले जात आहे.

मरेवर ४६ स्वयंचलित जिने, तर ३४ लिफ्ट

मध्य रेल्वेवर प्रवाशांना दिलासा देण्यासाठी येत्या वर्षभरात सुमारे ४६ स्वयंचलित जिने तर ३४ लिफ्ट बसवण्यात येणार असल्याचे रेल्वेकडून जाहीर करण्यात आले आहे. यात स्वयंचलित जिने कल्याण-८, ठाणे-८, दादर-२, डोंबिवली १, विक्रोळी-१, कांजूरमार्ग-१, मुलुंड-१, भांडुप-१, विद्याविहार-१, बदलापूर-१, वडाळा-३ चेंबूर, मानखुर्द २, ठाकुर्ली, छत्रपती शिवाजी टर्मिनस-२, उल्हासनगर-१ आदी स्थानकांचा समावेश आहे. तर छत्रपती शिवाजी टर्मिनस-३, डोंबिवली ३, घाटकोपर ३, दादर ३, ठाणे १, लोकमान्य टिळक टर्मिनस १, कल्याण ४, वडाळा ३, चेंबूर ३, मानखुर्द-३, किंगसर्कल २ रे रोड, १ डॉकयार्ड रोड १ व अन्य काही स्थानकांवर लिफ्ट बसवण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

दिवा स्थानकांत ऑक्टोबरनंतर ‘थांबा’

दिवा स्थानकात बांधण्यात येणाऱ्या दोन नवीन फलाटाचे काम येत्या ऑक्टोबपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे दिवा स्थानकांतही लोकलसह लांब पल्ल्याच्या गाडय़ांना थांबा देणे शक्य होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठय़ा प्रमाणात दिलासा मिळणार आहे. यात कोकणात जाणाऱ्या अनेक गाडय़ांना दिवा स्थानकात थांबा देता येणार आहे. सध्या कोकणात जाणाऱ्या जलद गाडय़ांना दिवा स्थानकांत थांबा दिला जात नाही. त्यामुळे प्रवाशांना गाडी पकडण्यासाठी छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकात गाडी पकडण्यासठी यावे लागते. त्यामुळे या थांब्यामुळे लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. तसेच वसई-दिवा मार्गावर धावणाऱ्या गाडय़ांनाही दिलासा मिळेल असे सांगितले जात आहे.