दक्षिण मुंबईतील पाकमोडिया स्ट्रीट येथे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारप्रकरणी विशेष ‘मोक्का’ न्यायालयाने बुधवारी इंद्रयाल खत्री आणि बिलाल मुस्तफा अली सय्यद आणि राशीद शेख अशा तीन आरोपींना जन्मठेप सुनावली. खून आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गेल्याच आठवडय़ात न्यायालयाने या तिघांना दोषी ठरवले. मात्र त्याच वेळी प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कुख्यात गुंड डी. के. राव याच्यासह उमेद उल रेहमान, अदनान सय्यद, असिद जान मोहम्मद शेख यांची न्यायालयाने निर्दोष सुटका केली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 20, 2015 1:34 am