News Flash

ट्विटरचे संकेतस्थळ आता मराठीत

मराठीत ट्विट करणे तसे नवीन नाही, पण आता संपूर्ण ट्विटरचे संकेतस्थळ किंवा अ‍ॅप मराठीतून उपलब्ध होणार आहे. ट्विटरने शुक्रवारी ही सुविधा अ‍ॅपबाजारात दाखल केली आहे.

| August 2, 2015 02:56 am

Twitter celebrates 10th birthday #LoveTwitter : बिझ स्टोन, ईव्हान विलियम्स आणि जॅक डॉर्सी या तिघांनी मिळून अमेरिकेच्या ऑस्टिन शहरात ही कंपनी सुरू केली होती.

मराठीत ट्विट करणे तसे नवीन नाही, पण आता संपूर्ण ट्विटरचे संकेतस्थळ किंवा अ‍ॅप मराठीतून उपलब्ध होणार आहे. ट्विटरने शुक्रवारी ही सुविधा अ‍ॅपबाजारात दाखल केली आहे.
भारतीय भाषांमध्ये संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यासाठी अनेक कंपन्या पुढे येत आहे. यात ट्विटरनेही उडी घेतली असून यापूर्वी कंपनीने संपूर्ण संकेतस्थळ वा अ‍ॅप हिंदीत उपलब्ध करून दिले होते. त्या वेळेस अन्य भारतीय भाषांमध्ये हे संकेतस्थळ उपलब्ध होईल असे कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले होते. शुक्रवारपासून हे संकेतस्थळ तसेच अ‍ॅप मराठी, गुजराती, तामिळ आणि कन्नड या भाषांमध्ये उपलब्ध करून दिली आहे. यापूर्वी ट्विटरवर आपण विविध भारतीय भाषांमध्ये ट्विट करता येणे शक्य होते.
मात्र आता या नव्या सुविधेमुळे संपूर्ण संकेतस्थळ किंवा अ‍ॅप आपल्याला त्या भाषेतून दिसणार आहे. म्हणजे आपण ज्या वेळेस ट्विटरचे संकेतस्थळ सुरू करतो त्या वेळेस आपण निवडलेल्या भाषेतूनच आपले स्वागत होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2015 2:56 am

Web Title: twitters website now in marathi
टॅग : Twitter
Next Stories
1 बेस्टच्या प्रवासी वाढीसाठी एनएसएसचे विद्यार्थी रस्त्यावर
2 विकास आराखडय़ासाठी२१ ऑगस्टपर्यंत मुदत
3 ‘शिवनेरी’मध्ये महिलांसाठी दहा आसने
Just Now!
X