30 September 2020

News Flash

काय पाहायचे काय नाही लोकांना ठरवू द्या, हायकोर्टाने सेन्सॉर बोर्डाला खडसावले

मल्टिप्लेक्समध्ये जाऊन चित्रपट पाहणारा प्रेक्षक प्रगल्भ असतो

चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष पहलाज निहलानी आणि बॉलिवूड यांच्यामध्ये या चित्रपटावरून वाद निर्माण झाला असून, निहलानींच्या हकालपट्टीची मागणी बॉलिवूडमधील निर्मात्यांनी केली आहे.

‘उडता पंजाब’मधील विविध संवादांना आणि दृश्यांना कात्री लावण्याच्या प्रयत्नात असलेल्या चित्रपट परिनिरीक्षण मंडळाला शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने खडसावले. दूरचित्रवाणी असू दे की चित्रपट काय पाहायचे काय नाही, हे लोकांना ठरवू द्या. प्रत्येकाला आपापली आवड असते. त्याप्रमाणे तो निर्णय घेतो, असे न्यायालयाने सुनावणीवेळी आपले निरीक्षण नोंदवले. मल्टिप्लेक्समध्ये जाऊन चित्रपट पाहणारा प्रेक्षक सुजाण असतो, असेही न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी न्यायालयाने सोमवारपर्यंत तहकूब केली. सोमवारी पुढील सुनावणीनंतर न्यायालय निकाल देऊ शकते.


उडता पंजाब प्रकरणी उच्च न्यायालयात गुरुवारी स्थगित झालेल्या सुनावणीला शुक्रवारी परत सुरुवात झाली. परिनिरीक्षण मंडळाच्या वकिलांनी चित्रपटातील अनेक संवाद, शब्द आक्षेपार्ह असल्याचे न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले. या चित्रपटात एका कुत्र्याला चॅकी चेन नाव देण्यात आले आहे. ते आक्षेपार्ह आहे. त्याचबरोबर चित्रपटात एक संवाद आहे. त्यामध्ये ‘जमीन बंजर और औलाद कंजर’ असे म्हणण्यात आले आहे. यामधील ‘कंजर’ शब्दाला मंडळाने आक्षेप घेतला. ‘कंजर’ शब्द बदनामी करणारा असल्याचे मंडळाच्या वकिलांनी म्हटले आहे. ज्या दृश्यांना मंडळाने कट्स सुचविलेले आहेत. ते अत्यंत बीभत्स आहेत, असा युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला.


‘गो गोवा गोन’ आणि ‘बॉम्बे टू गोवा’ अशी नावे असलेल्या चित्रपटांना हिरवा कंदील दाखवणाऱ्या चित्रपट परीनिरीक्षण मंडळाला (सेन्सॉर बोर्डाला) ‘उडता पंजाब’ चित्रपटात ‘पंजाब’ असा उल्लेख असलेला फलक दाखविण्यास विरोध का, त्यामुळे देशाच्या सार्वभौमत्वाला कसा धक्का पोहोचणार आहे, असे प्रश्न न्यायालयाने गुरुवारी मंडळाला विचारले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2016 1:38 pm

Web Title: udta punjab whether it is tv or cinema let the people see it
Next Stories
1 लंडनमध्ये माझी पाच मुले लपवलेली आहेत- करिना कपूर
2 वाचा ‘उडता पंजाब’मध्ये कोणकोणते कट्स सुचविण्यात आलेत?
3 ‘लौट आओ गौरी’
Just Now!
X