मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२०च्या अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या व त्यांच्या विविध बॅकलॉग परीक्षेच्या आयोजनाबाबत मुंबई विद्यापीठाकडू परिपत्रक काढण्यात आले आहे. याद्वारे मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांना परीक्षेसंदर्भात व अन्य सूचना करण्यात आल्या आहेत.

परिपत्रकात म्हटले आहे की, मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांचे प्रचार्य, मान्यताप्राप्त संसस्थांचे संचालक यांना कळवण्यात येत आहे की, शैक्षणिक वर्ष २०१९-२०च्या अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या व त्यांच्या बॅकलॉग परीक्षांच्या आयोजनासाठी विद्यापीठाच्या विविध सक्षम प्राधिकरणांनी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार सर्व महाविद्यालयांनी खाली नमुद केल्याप्रमाणे कार्यवाही करावी.

शैक्षणिक वर्ष २०१९-२०मधील अंतिम सत्राच्या पदवी, पदव्युत्तर व पदविका या परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थी व त्यांच्या बॅकलॉगच्या परीक्षांसाठी प्रविष्ट विद्यार्थांनी परीक्षा अर्ज सादर केले असतील, त्याच विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात यावी. महाविद्यालयांनी आपल्या महाविद्यालयातील अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांची माहिती संकलित करावी. तसेच, ज्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांनी फेब्रुवारी/मार्च २०२० मध्ये वर नमूद केलेल्या विद्यार्थांच्या बॅकलॉगच्या महाविद्यालयीन स्तरावरील परीक्षा घेतल्या असतील, तर त्या परीक्षा पुन्हा घेण्यात येवू नयेत.

परीक्षांच्या सुयोग्य आयोजनासाठी विद्यापीठाने विद्याशाखांनिहाय महाविद्यालयांचे क्लस्टर्स तयार केलेले आहेत व प्रत्येक क्लस्टरमधील एका महाविद्यालयाने लीड महाविद्यालय म्हणून विद्यापीठाने परीक्षेच्या नियोजनाची निश्चित केलेली जबाबदारी पार पाडावयाची आहे. ज्या विद्यार्थ्यांचे विद्यापीठात परीक्षा अर्ज सादर केलेल आहेत. परंतु, परीक्षा शुल्क भरलेले नाहीत, अशा महाविद्यालयांनी त्वरीत विद्यापीठाकडे परीक्षा शुल्क भरावे. असे देखील कळवण्यात आले आहे.