अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या आरोग्य देखभाल विधेयकाला रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांचा विरोध आहे. या योजनेवरील खर्च कमी करण्याची त्यांची मागणी आहे. याच मुद्द्यावरून दोन्ही पक्षांच्या सदस्यांमध्ये एकमत झाले नाही. अमेरिकेचे नवीन आर्थिक वर्ष आजपासून म्हणजेच १ ऑक्टोबरपासून सुरू होते. तत्पूर्वी या आरोग्य विधेयकाला मंजुरी मिळणे गरजेचे होते. मात्र, या विधेयकात सुचविलेल्या दुरुस्त्या अद्याप करण्यात आल्या नसल्याने रिपब्लिकनांनी विधेयकाच्या बाजूने मतदान करण्यास नकार दिला.
अमेरिकी सरकारचे आर्थिक कामकाज ठप्प; आरोग्य देखभाल विधेयकामुळे अभूतपूर्व संकट
विधेयक मंजूर न झाल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सरकार अंगिकृत सर्व सेवा बंद ठेवण्याचा निर्णय व्हाईट हाऊसतर्फे घेण्यात आला आहे. या परिस्थितीचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर आणि एकूणच जगाच्या आर्थिक उलाढालीवर काय परिणाम होईल याचे ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी वाचकांसाठी अतिशय सोप्या शब्दात केलेले विवेचन.