जगातील सर्वात लठ्ठ महिला इमान अहमद (३६) हिला मुंबईतील सफी रुग्णालयातून सोडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांच्या जुळवा-जुळवीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच तिला अबुधाबी येथील बुर्जलि रुग्णालयात हलवण्यात येणार आहे. सूत्रांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, इमानला मंगळवारीच मध्यरात्री हलवले जाण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात असले तरी सफी रुग्णालयातील डॉक्टरांकडून यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

११ फेब्रुवारी रोजी वजन कमी करण्यासाठी इमानला इजिप्तहून मुंबईत आणण्यात आले होते. तेव्हापासून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ५०० किलो वजन असल्याने बॅरियाट्रीक शस्रक्रिया करणे अवघड असल्याने तिला औषध उपचारवर ठेवण्यात आले होते. शरीरातील पाणी काढून इमानचे वजन आधी ३८० किलोपर्यंत घटवण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी तिच्यावर बॅरियाट्रीक  शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. ही शस्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर इमानचे वजन २४२ किलोपर्यंत पोहोचले होते. इमानची फिजीओथेरेपी आणि औषधांमुळे इमानचे वजन १७१ किलो पर्यंत घटवण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

Why did Lawrence Bishnoi gang fire outside Salman Khans house What is the extent of this gang
लॉरेन्स बिष्णोई टोळीने सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार का केला? या टोळीची व्याप्ती किती? पुन्हा हल्ला करण्याची धमकी किती गंभीर?
bmc, mumbai municipal corporation, Undertake Rs 209 Crore Drainage Project, Prevent Flooding, Andheri Subway, milan subway, bmc drainage project, mumbai monsoon, mumbai waterlogging, mumbai news,
अंधेरी सब वे पूरमुक्त करण्यासाठी आणखी २०९ कोटी, किमान तीन वर्षे लागणार
Drain cleaning mumbai
नालेसफाईला सुरुवात, आतापर्यंत १५ टक्के गाळ काढला
The crime branch police demanded a bribe of 10 lakhs crime news
गुन्हे शाखेच्या पोलिसाने मागितली १० लाखांची लाच; काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मात्र, डॉक्टरांवर उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप इमानची बहिण शायमा हिने केल्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण लागले. एकीकडे शायमा डॉक्टरांवर फसवणूक केल्याचा आरोप करत असतात दुसरीकडे शायमाला इमानला इथून घेऊनच जायचे नसल्याचे डॉक्टरांनी म्हटले होते. त्यानंतर इमानवर उपचार करणाऱ्या डॉ. अर्पणा भास्कर यांनीही चमूतून राजीनामा दिला होता.

मात्र इमानला आता पुढील उपचारासाठी अबुधाबी येथील बुर्जलि रुग्णालयात हलवण्यात येणार असल्याचे शायमा यांनी सांगितले होते. त्यानुसार अबुधाबी येथील रुग्णालयातील एक डॉक्टरांचे पथक इमानला पाहण्यासाठी मुंबईतही आले. तिच्यावर सुरू असलेल्या सर्व उपचारांचा तपशील या डॉक्टरांनी जाणून घेतला. त्यानुसार इमानला अबुधाबीला हलवण्यापूर्वी रुग्णालयात तिच्यावर झालेल्या सर्व उपचारांचा तपशील जुळवा-जुळव करण्याचे काम सुरू होते. त्यानुसार इमानवर उपचार करण्यात आलेल्या तपासणीचा अहवाल  बॅरिअ‍ॅट्रिक सर्जन डॉ. मुजफ्फर लकडावाला यांनी अबुधाबी येथून आलेल्या डॉक्टरांना दिला आहे.

मंगळवारी रात्री उशीरा तिला सफी रुग्णालयातून अबुधाबीला हलवण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती.