एसटी महामंडळातील ११९८४ निलंबित वाहकांना सेवेत परत घेण्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी विधानसभेत केली. हे सर्व वाहक अपहार प्रकरणाच्या आरोपांनंतर निलंबित करण्यात आले होते. त्यांना सुधारण्याची एक संधी मिळावी म्हणून सेवेत परत घेण्यात येणार असल्याचे रावते यांनी सांगितले. एवढ्या मोठ्या प्रमाणात निलंबित कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याची ही बहुदा पहिलीच वेळ आहे.
वेगवेगळ्या प्रकरणांत अपहाराच्या आरोपांनंतर ११९८४ वाहकांना एसटीकडून निलंबित करण्यात आले होते. या सर्वांना सेवेत परत घेऊन सुधारण्यासाठी एक संधी देण्यात येणार असल्याचे रावते यांनी सांगितले. एसटी महामंडळाकडे सध्या वाहकांची पदे रिक्त असल्यामुळे या सर्वांना पुन्हा सेवेत घेण्याचा महामंडळाला फायदा होऊ शकतो.