scorecardresearch

Central Railway: मध्य रेल्वेवरील १४ वातानूकुलीत लोकल फेऱ्या रद्द

वातानुकूलित लोकलमध्ये बिघाड होण्याचे प्रकार वाढत असून त्यामुळे फेऱ्या रद्द करण्याची वेळ मध्य रेल्वेवर येत आहे.

Central Railway: मध्य रेल्वेवरील १४ वातानूकुलीत लोकल फेऱ्या रद्द
(संग्रहित छायाचित्र)

प्रवाशांना का सोसावा लागला मनस्ताप वाचा

मुंबई : प्रवाशांना कल्पना न देताच मध्य रेल्वेने बुधवारी वातानुकूलित लोकलच्या १४ फेऱ्या अचानक रद्द केल्या. त्यामुळे नेहमीप्रमाणे वातानुकूलित लोकलमधून प्रवास करण्यासाठी स्थानकात आलेल्या प्रवाशांची गैरसोय झाली. मध्य रेल्वेवर दररोज ५६ वातानुकूलित लोकल फेऱ्या होतात. कमी फेऱ्या असल्याने वातानुकूलित लोकल पकडण्यासाठी प्रवाशांना नियोजित वेळेवर स्थानकात पोहोचावे लागते. मात्र गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द करण्यात येत आहेत. वातानुकूलित लोकलमध्ये बिघाड होण्याचे प्रकार वाढत असून त्यामुळे फेऱ्या रद्द करण्याची वेळ मध्य रेल्वेवर येत आहे.

हेही वाचा >>> फुकट्यांचा प्रथम श्रेणी, वातानुकूलित प्रवाशांना ताप; विशेष मोहिमेत ३७९ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई

हेही वाचा >>> मुंबई: पश्चिम रेल्वेवरील नव्या एसी लोकलसाठी वर्षभराची प्रतिक्षा

बुधवारीही वातानुकूलित लोकलच्या दिवसभरातील १४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यात तीन जलद लोकल फेऱ्यांचा समावेश होता. तांत्रिक बिघाड झाल्याने वातानूकूलित लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. परिणामी, दिवसभरात वातानुकूलित लोकलच्या ४२ फेऱ्या झाल्या. सकाळी ७.०४ वाजताची ठाणे – सीएसएमटी धिमी वातानुकूलित लोकल, सकाळी ८.०४  ची सीएसएमटी-ठाणे जलद लोकल, सकाळी ९.०३ ची ठाणे-सीएसएमटी जलद, सकाळी ९.५१ ची सीएसएमटी-सीएसएमटी जलद, सकाळी ११.१७ ची अंबरनाथ -सीएसएमटी धिमी लोकल, सायंकाळी ४.५५ ची डोंबिवली-सीएसएमटी धीमी, सायंकाळी ६.१८ ची सीएसएमटी-डोंबिवली धीमी, सायंकाळी ७.५० ची डोंबिवली-सीएसएमटी धीमी, रात्री ९.१६ ची सीएसएमटी-कल्याण धीमी, रात्री १०.५६ ची कल्याण-सीएसएमटी धीमी, मध्यरात्री १२.३१ ची सीएसएमटी-कुर्ला धीमी लोकल यासह आणखी काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 16:38 IST

संबंधित बातम्या