मध्य रेल्वेने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी यंदा तब्बल १४२ विशेष गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसटी, एलटीटी, दादर व पुणे ते करमाली, सावंतवाडी, रत्नागिरी दरम्यान या विशेष गाडय़ा धावणार आहेत. त्यामुळे गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासाची सोय होणार आहे.

०११८७ लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी एसी डबलडेकर गाडी २२ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान दर मंगळवारी पहाटे ५ वाजुन ३३ मिनिटांनी सुटणार असुन रत्नागिरीला दुपारी १ वाजता पोहचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी ०११८८ रत्नागिरी- ते लोकमान्य टिळक टर्मिनस ट्रेन  दुपारी ३ वाजुन २० मिनिटांनी सुटणार असुन एलटीटीला रात्री १२ वाजुन २०मिनिटांनी पोहचणार आहे. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळुण, सावर्डे, अरवली रोड आणि संगमेश्वर या स्थानकांत थांबा देण्यात येणार आहे.

०१४४५ सीएसटी-करमाली विशेष गाडी (२४फेऱ्या-वन वे) १८ ऑगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान दररोज रात्री १२ वाजून ३० मिनिटांनी सुटणार असून करमाळीला दुपारी २ वाजून ३० मिनिटींने पोहचणार आहे. दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळुण, सावर्डे, अरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, अडवली, वलिवडे, राजापुर, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झराप, सावंतवाडी, मडुरे आणि थिविम या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.

याशिवाय  ०१११३-०१११४ दादर-सावंतवाडी स्पेशल ट्रेन (२४ फे-या,आठवडय़ातून तीन वेळा) १८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान रविवार, मंगळवार आणि शुक्रवारी सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी सुटणार असून सावंतवाडीला रात्री ७ वाजुन ५० मिनिटांनी पोहचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी दर सोमवारी, बुधवारी आणि शनिवारी पहाटे ४ वाजून ५० मिनिटांनी सांवंतवाडीहुन सुटलेली ट्रेन दादरला दुपारी ४ वाजता पोहचणार आहे. ०११८५ दादर-रत्नागिरी स्पेशल ट्रेन १८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान दर शुक्रवारी रात्री ९ वाजुन ४५ मिनिटांनी सुटणार असुन रत्नागिरीला पहाटे ५ वाजुन ५० मिनिटांनी पोहचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी ०११८६रत्नागिरी-दादर स्पेशल ट्रेन १९ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर दरम्यान दर शनिवारी सकाळी ९ वाजता सुटणार असुन दादरला संध्याकाळी ५ वाजता पोहचणार आहे. या ट्रेनला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळुण, सावर्डे, अरवली रोड आणि संगमेश्वर रोड या स्थानकांत थांबा देण्यात येणार आहे. ०१०३७ एलटीटी-सावंतवाडी एसी स्पेशल ट्रेन २४ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान दर गुरुवारी रात्री ९ वाजुन ४५ मिनिटांनी सुटणार असुन सावंतवाडीला दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता पोहचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी ०१०३८ सावंतवाडी-एलटीटी एसी स्पेशल ट्रेन २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान दर शुक्रवारी दुपारी २ वाजुन ५मिनिटांनी सुटणार असुन रात्री १२ वाजुन २० मिनिटांनी एलटीटीला पोहचणार आहे. याशिवाय ०१४२३-०१४२४ पुणे-सावंतवाडी-पुणे दरम्यान एसी स्पेशल ट्रेनच्या सहा फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.