मुंबई : मुंबईतील १५ वर्षीय मुलीचा मृत्यू करोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यामुळे झाला नसल्याचा निर्वाळा वैद्यकीय तज्ज्ञांच्या राज्यस्तरीय उपसमितीने दिला आहे. १५ ते १७ वर्षे वयोगटातील किशोरवयीन बालकांचे लसीकरण मुंबईत ३ जानेवारीपासून सुरू झाले. १४ जानेवारीला एका १५ वर्षीय मुलीचा मृत्यू लस घेतल्यामुळे झाल्याची माहिती समाजमाध्यमांमध्ये प्रसारित केली गेली. याचा सखोल अभ्यास करून तपासणी अहवाल पालिकेने तयार केला. लसीकरणानंतर घडणाऱ्या प्रतिकूल घटनांची चिकित्सा करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार वैद्यकीय तज्ज्ञांची राज्यस्तरीय उपसमिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये हा अहवाल सादर करण्यात आला. समितीने तयार केलेल्या अहवालाचा अभ्यास करून या मुलीचा मृत्यू करोना प्रतिबंधात्मक लशीमुळे झालेला नाही, असे स्पष्ट केले आहे. शहरात सोमवापर्यंत १ लाख ४७ हजार ९४४ बालकांनी लस घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 15 year old girl in mumbai did not die due to covid 19 vaccine zws
First published on: 18-01-2022 at 04:24 IST