चेंबूर येथे पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी २० वर्षीय तरूणाला आरसीएफ पोलिसांनी अटक केली. आरोपीविरोधात बलात्कार व बालकांचे लैंगिक अपहाराधापासून संरक्षण कायद्याअंतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पीडित मुलगी सार्वजनिक शौचालयात गेली होती. त्यावेळी आरोपी तिच्या मागावर होता. तेथे कोणी नसल्याचे पाहून आरोपीने मुलीवर अत्याचार केला.

हेही वाचा >>> संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात २१९ पेक्षा जास्त पक्षी प्रजाती

पीडित मुलीच्या आईला हा प्रकार कळाल्यानंतर त्यांनी तात्काळ याप्रकरणी पोलीस नियंत्रण कक्षाला दूऱध्वनी केला. घटनास्थळी पोलीस पोहोचल्यानंतर महिलेने घडलेला प्रकार त्यांना सांगितला. पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून बलात्कार व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले असून तिची प्रकृती ठीक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.