मुंबई : करोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सोमवारी राज्यातील सर्व रुग्णालयांतील सुविधांचा आढावा घेण्यात आला. मुंबईतील सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये सध्या करोनाबाधित रुग्णांसाठी ५० खाटा राखीव असून, रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन या रुग्णालयातील आरक्षित खाटांची संख्या २५० पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सध्या सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये ५० खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये ४० खाटा सामान्य असून, १० खाटा अतिदक्षता विभागामध्ये राखीव आहेत. सध्या रुग्णालयामध्ये फक्त पाचच करोनाचे रुग्ण दाखल आहेत. यामध्येही एकाही रुग्णाची प्रकृती गंभीर नाही. मात्र सध्या करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णालय प्रशासन सतर्क झाले आहे. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यास रुग्णांना योग्य उपचार मिळावेत यासाठी रुग्णालयामध्ये २५० खाटा राखीव ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या खाटाही कमी पडल्यास संपूर्ण रुग्णालय करोनासाठी राखीव ठेवण्यात येईल, अशी माहिती जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली. करोनाचा सामना करण्यासाठी सेंट जॉर्जेस रुग्णालय सज्ज असून राखीव खाटांचे नियोजन करण्यात आले आहे. आवश्यकता पडल्यास खाटा वाढविण्याची तयारी आहे. सध्या आवश्यक औषधसाठाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी दिली.

increase in the number of floodplains Water pumping pumps at 481 places during monsoon
जलमय सखल भागांच्या संख्येत वाढ? पावसाळ्यात ४८१ ठिकाणी पाणीउपसा पंप; खर्चातही वाढ
mumbai, registered vehicle number, RTO, traffic jam, vehicular pollution
मुंबईत वाहतूक कोंडी, प्रदूषणाचे संकट; वर्षभरात अडीच लाख वाहनांची नोंदणी; एकूण वाहने ४६ लाखांवर
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
Why three new swimming pools will start in Mumbai How to plan the municipal corporation
पाण्याचा तुटवडा, तरीही मुंबईत तीन नवे जलतरण तलाव का सुरू होणार? महापालिकेचे नियोजन कसे?

हेही वाचा – राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला, आता घड्याळ चिन्हाचं काय? जयंत पाटील म्हणाले, “आमच्या पक्षाच्या…”

हेही वाचा – म्हाडा कोकण मंडळ सोडत २०२३ : मुदतवाढ आणि नियम बदलानंतर प्रतिसाद वाढला; आतापर्यंत २१ हजार २७९ अर्ज

सेंट जॉर्जेससोबत जीटी रुग्णालयही सज्ज

सेंट जॉर्जेसमध्ये खाटांचे योग्य प्रकारे नियोजन करण्यात आले आहे. मात्र करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यास राज्य सरकारच्या सूचनांनुसार जी.टी. रुग्णालयामध्ये करोना रुग्णांसाठी खाटा उपलब्ध करण्याची तयारी करण्यात आली आहे. कराेनाचा सामना करण्यासाठी सेंट जॉर्जेस रुग्णालयासोबत जी. टी. रुग्णालयही सज्ज असल्याची माहिती डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली.