देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजची ४४वी वार्षिक महासभा (AGM ) आज (गुरुवार) होणार आहे. यामध्ये रिलायन्स जिओ 5G सेवा सुरू करण्यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिओसह अनेक टेलीकॉम कंपन्यांना दूरसंचार विभागाकडून देशातील 5G सेवांची चाचणी घेण्याची परवानगी मिळाली आहे. अलीकडेच जिओने मुंबईत 5G फील्डची चाचणी केली आहे. लवकरच इतर शहरांमध्ये ही चाचणी घेण्यात येणार आहे. रिलायन्स जिओ आज एजीएममध्ये याची घोषणा करू शकते. ही एजीएम आज दुपारी २ वाजता सुरू होईल.

यापूर्वी देशात रिलायन्स कंपनी 4G सेवा देण्यात अग्रणी राहिली आहे. त्यामुळे 5G सेवा सुरू करण्याच्या बाबतीत ते आघाडीवर असतील, अशी चर्चा आहे. रिलायन्सने यापूर्वी २०२१ च्या मध्यापासून 5G सेवा सुरू करण्यास सांगितले होते.

हेही वाचा- जरा रिचार्ज मार ना… Whatsapp वरुन थेट Jio कंपनीलाच करता येणार मेसेज

एजीएमवर शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष

रिलायन्सच्या या एजीएमवर शेअर बाजाराच्या गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष आहे. रिलायन्सने गेल्या आर्थिक वर्षात कशी कामगिरी केली हे या वार्षिक महासभेत कळेल. तर रिलायन्सने पुढच्या काही वर्षांसाठी कोणती महत्वाकांक्षी योजना आखल्या आहेत हे देखील समजेल.

याशिवाय रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी आपल्या तेलाच्या रासायनिक व्यवसायासाचा २० टक्के हिस्सा Saudi Aramco ला विकण्याची घोषणा करू शकतात. गेल्या दहा वर्षांच्या इतिहासावर नजर टाकल्यास एजीएमनंतर रिलायन्सचे शेअर्स आणखी बळकट होत असल्याचे दिसून आले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 44th reliance agm jio likely to make several important announcements 5g launch today srk
First published on: 24-06-2021 at 10:58 IST