रायगडमधील इंदापूरजवळ एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मुंबई – गोवा महामार्गावर शिवनेरी बस आणि मारुती कारमध्ये हा अपघात झाल्याचे कळते.
मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेल्या शिवनेरी बसने समोरुन येत असलेल्या मारुती कारला जोरदार धडक दिली. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. एसटीतील एका प्रवाशाचा रुग्णालयाच्या वाटेवर असताना मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन पुरुष, एक महिला आणि एका चिमुरडयाचा समावेश आहे.
हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये एसटीच्या पुढील भागाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th May 2016 रोजी प्रकाशित
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, ५ जणांचा मृत्यू
मुंबई – गोवा महामार्गावर शिवनेरी बस आणि मारुती कारमध्ये हा अपघात झाल्याचे कळते.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
First published on: 15-05-2016 at 11:50 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 dead in mumbai goa highway accident