लोहमार्ग पोलिसांच्या हेल्पलाइनवर संपर्क; वस्तू सापडण्याचे प्रमाण मात्र कमी

मुंबई : मोबाइलमधील करमणूक पाहण्यात गुंतलेले प्रवासी किं वा रंगलेला गप्पांचा फड यांमुळे लोकल प्रवासात अनेकदा प्रवासी आपल्या मौल्यवान वस्तू लोकलमध्येच विसरतात. अशा विसरभोळ्या प्रवाशांनी वस्तू गहाळ झाल्याच्या किंवा त्या विसरल्याच्या पाच हजार ६१३ तक्रोरी लोहमार्ग पोलिसांच्या १५१२ हेल्पलाइनवर दोन वर्षांत करण्यात आल्या आहेत. यापैकी सर्वाधिक तक्रोरी मध्य रेल्वेकडे करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या वस्तू सापडण्याचे प्रमाण मात्र अत्यंत कमी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेल्वे प्रवाशांच्या मदतीसाठी १५१२ हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. प्रवासात एखादी वस्तू हरवणे, विसरणे, याशिवाय लोकलमधील महिला आणि अपंगांच्या राखीव डब्यात घुसखोरी, विनयभंग, छेडछाड, फे रीवाला, भिकारी, मद्यप्राशन करून प्रवास करणारे इत्यादींविषयी तक्रोरींचा भडिमार हेल्पलाइनवर होत असतो. जानेवारी ते डिसेंबर २०२० या काळात  पाच हजार ६४० आणि जानेवारी ते जुलै २०२१ दरम्यान दोन हजार ८९५ तक्रोरी अशा विविध प्रकारच्या एकू ण ८,५३५ तक्रोरी करण्यात आल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली. लोकलमध्ये वस्तू विसरल्याने मदतीसाठी सर्वाधिक ५,६१३ तक्रारी करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेवर तीन हजार ६१७ आणि उर्वरित तक्रारी या पश्चिम रेल्वेवरील आहेत. वस्तूंमध्ये कुणी खरेदी केलेले सामान, तर कुणाची कार्यालयीन बॅग, तसेच महत्त्वाच्या कागदपत्रांची पिशवी इत्यादींचा समावेश आहे. हेल्पलाइनच्या माध्यमातून तक्रार मिळताच लोहमार्ग पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जातो, अशी माहिती देण्यात आली. परंतु ते सापडण्याचे प्रमाण बरेच कमी आहे. आतापर्यंत २,२६० वस्तूच सापडल्या आहेत.

राखीव डब्यात घुसखोरी

लोकलच्या महिला, अपंग डब्यात अन्य प्रवाशांनी घुसखोरी के ल्याच्याही तक्रोरी हेल्पलाइनवर आल्या आहेत. अपंगांच्या डब्यात घुसखोरी केल्याने २०२० मध्ये ३२२ तक्रारी हेल्पलाइनवर करण्यात आल्या, तर २०२१ मध्ये हीच संख्या ५३ होती. महिला डब्यात घुसखोरी के ल्याच्या २१० तक्रारी करण्यात आल्या आहेत. अपंग तसेच महिला प्रवाशांच्या या तक्रोरीनंतर त्वरित हेल्पलाइनकडून लोहमार्ग पोलीस ठाण्यांशी संपर्क साधून कार्यवाही केली जाते.

हेल्पलाइनवर मदत तसेच तक्रारीसाठी आलेले कॉल

प्रवाशांनी केलेले कॉल कॉलची संख्या

भिकारी व गर्दुल्लय़ांविरोधात   २०

दारू पिऊन प्रवास करणारे प्रवासी  ६६

फेरीवाल्यांविरोधात ४२

जखमी प्रवाशांच्या मदतीसाठी  १६२

बेपत्ता  प्रवासी      ७३

विनयभंग   १५

प्रवाशांमध्ये भांडण-वादविवाद   २९९

आजारी प्रवासीविषयी   १५१

लोकलवर दगडफेक  २४

लोकल प्रवासात स्टंट करणे   २२

चोरी  ६६

अन्य तक्रोरी  १३९७

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5613 complaint loss goods local travel ssh
First published on: 27-08-2021 at 00:33 IST