राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या १२२ वर पोहचली आहे. मुंबई पाच तर ठाण्यात १ रुग्ण  आढळल्याने ११६ वरुन ही संख्या १२२ वर गेली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. तीन तासात ६ नवे रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १२२ वर पोहचली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोमवारपर्यंत महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ९७ वर होती. मंगळवारी सकाळी ४ नवे रुग्ण आढळल्याने ती १०१ वर पोहचली. त्यानंतर संध्याकाळपर्यंत ही संख्या १०७ वर पोहचली. आता नऊ नवे रुग्ण आढळल्याने ही संख्या ११६ झाली. त्यानंतर सहा नवे रुग्ण आढळले आहेत ज्यामुळे ही संख्या १२२ वर पोहचली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंता वाढवणारीच ही बातमी आहे. तरीही घाबरुन जाऊ नका आणि स्वयंशिस्त पाळा असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

आणखी वाचा- आपल्या वर्तमान काळावरच भविष्य अवलंबून : मुख्यमंत्री

दरम्यान आजच उद्धव ठाकरे यांनीही जनतेला हेच आवाहन केलं की घराबाहेर पडू नका. स्वतःला सांभाळा. मिळालेला वेळ हा कुटुंबीयांसोबत घालवा. लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा थांबणार नाहीत हेदेखील त्यांनी स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 6 new coronavirus positive cases have been reported in the state today 5 in mumbai and 1 in thane state rise 122 scj
First published on: 25-03-2020 at 17:14 IST