scorecardresearch

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवासाला गती; खोपोली – कुसगाव नवीन मार्गिकेचे ६५ टक्के काम पूर्ण

मुंबई – पुणे द्रुतगती मार्गामुळे प्रवास वेगवान झाला आहे, मात्र त्याचवेळी या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढू लागले आहे.

mumbai pune expressway
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग (संग्रहित छायचित्र) फोटो सौजन्य : लोकसत्ता

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवासाचा कालावधी २० ते २५ मिनिटांनी कमी करण्यासाठी खोपोली – कुसगावदरम्यान नव्या मार्गिकेचे (मिसिंग लेन) बांधकाम हाती घेतले आहे. हे काम ६५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम युद्धपातळीवर सुरू आहे. डिसेंबर २०२२ अखेरीस मार्गिकेचे काम पूर्ण होईल आणि जानेवारी २०२४ पासून ही नवीन मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होईल, असा दावा ‘एमएसआरडीसी’कडून करण्यात आला.

मुंबई – पुणे द्रुतगती मार्गामुळे प्रवास वेगवान झाला आहे, मात्र त्याचवेळी या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढू लागले आहे. या पार्श्वभूमीवर ‘एमएसआरडीसी’ने अपघात रोखण्यासाठी, तसेच प्रवास आणखी वेगवान करण्यासाठी खोपोली – कुसगावदरम्यान नवीन मार्गिका (मिसिंग लेन) बांधण्याचा निर्णय घेतला. या १९.८० किमी लांबीच्या नव्या मार्गिकेच्या (मिसिंग लेन) कामाला फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरुवात करण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 03:54 IST

संबंधित बातम्या