मुंबई : पर्यटन संचालनालयाच्या बँक खात्यातून ६८ लाख रुपये इतर बँक खात्यांमध्ये वळते करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पर्यटन संचालनालयाचे मुख्य लेखा अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात चौघांविरोधात फसवणूक, तोतयागिरी व बनावट धनादेश बनवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा झाली असून त्याबाबत मरीन ड्राईव्ह पोलीस अधिक तपास करत आहेत.

मुख्य लेखा अधिकारी विठ्ठल सुडे यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार १३ ते १६ फेब्रुवारी २०२४ या कालावधी पर्यटन संचालनालयाच्या बँक खात्यातून १५ विविध बनावट धनादेशाद्वारे रक्कम हस्तांतरित करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. राष्ट्रीयकृत बँकेच्या नरिमन पॉईंट येथील मंत्रालयीन शाखेतील चालू बँक खाते आहे. त्यातून ही रक्कम विविध बँक खात्यांमध्ये वळती करण्यात आली आहे. याप्रकरणी आकाश डे, तपन मंडल, लक्ष्मी पाल व आनंदा मंडल यांच्या विरोधात फसवणूक, तोतयागिरी व बनावट धनादेश बनवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश डेच्या बँक खात्यावर २२ लाख ७९ हजार रुपये, तपन मंडल याच्या बँक खात्यावर २२ लाख ७३ हजार रुपये, पाल हिच्या बँक खात्यावर १३ लाख ९१ हजार रुपये  व आनंदा याच्या बँक खात्यावर ९ लाख २४ हजार रुपये हस्तांतरित झाल्याचे बँकेकडून मिळालेल्या माहितीवरून उघड झाले आहे. एकूण ६८ लाख ६७ हजार रुपये विविध बँक खात्यांमध्ये वळते करण्यात आले असून त्यासाठी १५ धनादेशांचा वापर करण्यात आला आहे. ते बनावट असल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.

Tejas Garge, Hearing,
तेजस गर्गे अटकपूर्व जामीन अर्जावर शनिवारी सुनावणी
loksatta analysis bmc railway police dispute cause ghatkopar hoarding collapse tragedy
घाटकोपर दुर्घटना बीएमसी, रेल्वे पोलिसातील वादामुळे? होर्डिंगबाबत मुंबई महापालिका १६ वर्षे जुने धोरण का वापरते?
RTO Corruption Exposed, Three Officials Arrested, amravati rto, Registering Stolen Trucks, three Officials Arrested Registering Stolen Trucks, Forged Documents, egional Transport Office or Road Transport Office, Amravati news, marathi news,
अमरावती : तीन आरटीओ अधिकाऱ्यांना अटक; चोरीच्या ट्रकची बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी
thane, municipal corporation, tax relief scheme, thane citizens
ठाणेकरांसाठी पालिकेची कर सवलत योजना, दहा टक्क्यापासून ते दोन टक्क्यांपर्यंत मिळणार करसवलत
Delhi Bomb Threat
दिल्लीतील १०० शाळांना बॉम्ब हल्ल्याची धमकी; केंद्रीय यंत्रणांकडून तपास सुरू
Assistant Police Inspector promoted soon
आनंदाची बातमी! सहायक पोलीस निरीक्षकांना लवकरच पदोन्नती
Mumbai, MHADA, Extends Deadline, E Auction, 17 Plots, Mumbai MHADA, mumbai news, mhada news, marathi news, e auction in mumbai,
मुंबईतील १७ भूखंडांच्या ई-लिलावाच्या निविदेला मुदतवाढ ? एक – दोन दिवसात निर्णय
trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

हेही वाचा >>>मुलुंडमधील प्रकल्पग्रस्तांच्या घर बांधणी प्रकल्पाविरोधात घंटानाद आंदोलन

परराज्यातील बँक खात्यात रक्कम हस्तांतरित

याप्रकरणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रक्कम हस्तांतरित करण्यात आलेली सर्व बँक खाती परराज्यातील आहेत. आरोपींनी बनावट धनादेश तयार केले आहेत. रक्कम हस्तांतरित करण्यात आलेले सर्व धनादेश पर्यटन संचालनालयाकडे आहेत. त्यामुळे याप्रकरणामागे सराईत टोळीचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे.