बास्केट बॉल खेळत असताना केनेथ रुझारियो या ७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी माटुंगा येथील डॉन बॉस्को शाळेत घडलीे. माटुंगा पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद केली आहे. केनेथ दुसऱ्या इयत्तेत होता. मंगळवारी सकाळी शाळेत नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांचा बास्केट बॉलचा सराव सुरू होता. सर्व मुलांना रांगेत उभे करून बास्केटमध्ये बॉल टाकण्याचा सराव केला जात होता. केनेथने बॉल टाकला आणि त्यानंकर तो खाली कोसळला. त्याला तात्काळ खाजगी रुग्णालयात आणि नंतर शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेण्यात आले. दुपारी साडेबारा वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. केनेथच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाले असून त्याचा अहवाल आल्यानंतर त्याच्या मृत्युचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र ठाकूर यांनी सांगितले. अर्थात वरकरणी पाहता यात संशयास्पद काही नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.
केनेथचे वडिल र्मचट नेव्ही मध्ये असून सध्या ते बोटीवर आहेत. शाळेने त्यांना याप्रकरणाची माहिती ईमेलद्वारे कळवली आहे. केनेथला साडेचार वर्षांची लहान बहिण आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jan 2015 रोजी प्रकाशित
शाळेत बास्केटबॉल खेळताना चिमुरडय़ाचा मृत्यू
बास्केट बॉल खेळत असताना केनेथ रुझारियो या ७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी माटुंगा येथील डॉन बॉस्को शाळेत घडलीे.
First published on: 07-01-2015 at 02:12 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 7 year old boy died while playing basket ball