रुळांजवळील ९७८ अतिक्रमणांवर हातोडा

पश्चिम रेल्वेकडून रूळ ओलांडणाऱ्या ४,४७२ जणांची धरपकड

पश्चिम रेल्वेकडून रूळ ओलांडणाऱ्या ४,४७२ जणांची धरपकड

मुंबई : अपघात कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने हाती घेतलेल्या ‘मिशन शून्य अपघात’ मोहिमेंतर्गत रूळ ओलांडण्याच्या प्रकारांना रोखण्यासाठी या वर्षांत रुळांजवळील ९७८ अतिक्र मणे पाडण्यात आली, तर रूळ ओलांडणाऱ्या ४,४७२ जणांची धरपकडही के ली आहे.

रूळ ओलांडून पलीकडच्या फलाटावरून जाणे, जवळचा रस्ता म्हणून रूळ ओलांडणे हे प्रकार अपघाताला निमंत्रण देणारे ठरतात. रूळ ओलांडताना लोकल किं वा मेल-एक्स्प्रेसची धडक बसून प्रवासी गंभीर जखमी होतात. प्रसंगी जीवही गमावतात. त्यामुळे स्थानकातील किं वा जवळील पादचारी पुलांचा वापर करण्याचे आवाहन रेल्वेकडून वारंवार के ले जाते. याकडे अनेक जण दुर्लक्ष करतात. दुर्लक्ष के ल्याने मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर जानेवारी ते सप्टेंबर २०२० पर्यंत लोकल किं वा मेल-एक्स्प्रेसची धडक लागून ४६५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ९३ जण जखमी झाले आहेत. यापैकी पश्चिम रेल्वेवर १७२ जण ठार झाले आहेत. जूनपासून लोकल सेवा हळूहळू पूर्ववत झाल्यानंतरही रूळ ओलांडताना रेल्वेगाडय़ांच्या धडके त मध्य आणि पश्चिम रेल्वेवर १३५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

हे अपघात रोखण्यात रेल्वे प्रशासन अद्यापही यशस्वी झालेले नाही. मात्र पश्चिम रेल्वेने रूळ ओलांडण्याच्या प्रकारांना आळा घालत असल्याचा दावा के ला आहे. रुळांजवळील अतिक्र मणांमुळेही रूळ ओलांडण्याचे प्रकार घडतात. अतिक्र मणात राहणारे शॉर्टकटचा पर्याय निवडतात. त्यासाठी संरक्षक भिंतही तोडतात. म्हणून रेल्वेने २०१९ मध्ये ६०० अतिक्र मणे पाडली, तर २०२०मध्ये ९७८ अतिक्र मणे पाडण्यात आल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकू र यांनी सांगितले. स्थानकात आणि दोन स्थानकांदरम्यान नवीन पादचारी पूल, सरकते जिने बांधण्यात येत असून ग्रॅण्ट रोड स्थानकाजवळील फे ररे उड्डाणपूल, लोअर परळ उड्डाणपुलांची कामेही गतीने सुरू असल्याचे ठाकू र म्हणाले.

रूळ ओलांडणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई

गेल्या वर्षी रूळ ओलांडणाऱ्या १६,०६० जणांना पकडण्यात आले. यावर्षी ४,४७२ जणांवर कारवाई करण्यात आली. रेल्वे रुळांजवळ रेल्वे सुरक्षा दल आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान तैनात केले असून त्यांच्या सतर्कतेमुळे २०२० मध्ये रूळ ओलांडणाऱ्या सहा जणांना वाचवण्यात आले. २०१९ मध्ये २१ जणांचा जीव वाचवण्यात रेल्वे पोलिसांना यश आले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 978 illegal structures near the railway tracks demolished zws

ताज्या बातम्या