एक्स गर्लफ्रेंडसोबत केलेलं व्हिडीओ चॅट पॉर्न साइटवर पोस्ट करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअर असणाऱ्या तरुणाने गर्लफ्रेंडसोबत व्हिडीओ चॅटिंग केलं होतं. यावेळी काही खासगी क्षण तरुणाने रेकॉर्ड केले होते. हे रेकॉर्डिंग त्याने पॉर्न साइटवर अपलोड केलं. तरुणीला जेव्हा याबाबत कळलं तेव्हा तिने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.

तरुणाने आपला चॅटिंग व्हिडीओ पॉर्न साइटवर अपलोड केल्याची तरुणीला कल्पनाच नव्हती. तिला एका मित्राकडून याबाबत कळलं. आपली फसवणूक झाल्याचं कळल्यानंतर तरुणीला मोठा धक्का बसला. तिने तशीच पवई पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांत तक्रार करण्याआधी तरुणीने तरुणाकडे विचारणा केली. मात्र तरुणाने आपण पॉर्न साइटवर असा कोणताही व्हिडीओ अपलोड केला नसल्याचा दावा केला. यामुळे दोघांमध्ये जोरदार भांडण झालं आणि तरुणीने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. पोलिसांनी तरुणाचा मोबाइल फोन जप्त करुन तपासणी केली असता त्यामध्ये तो व्हिडीओ आढळला. यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली.