व्यावसायिकाकडे सव्वालाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी गुरुवारी रात्री सुदाम साहिल याला अटक केली. आरोपीला १२ हजार रुपये खंडणी स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख यांनी दिली.

हेही वाचा- एक कोटी प्रवाशांनी केला गारेगार प्रवास; मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलला प्रतिसाद वाढला

Stone Pelting in West Bengal
Ram Navami : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, मिरवणुकीत दगडफेक; पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर!
Five cases filed against extortionist Vaibhav Deore three crore extortion from BJP office-bearer
खंडणीखोर वैभव देवरेविरुध्द पाच गुन्हे दाखल, भाजप पदाधिकाऱ्याकडून तीन कोटी खंडणी
fire workers huts at Mira road
मिरारोड येथे कामगारांच्या झोपड्यांना भीषण आग, चार सिलेंडरचा स्फोट; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!

तक्रारदार लोअर परळ येथील रहिवासी आहेत. त्यांची साकीनाका परिसरात लाँड्री आहे. त्यांच्या दुकानाची महानगरपालिकेकडे तक्रार न करण्यासाठी आरोपीने इतर साथीदाराच्या मदतीने सव्वालाख रुपयांची खंडणी मागितली होती. जुलै २०२२ पासून हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी आरोपीच्या साथीदाराने व्यावसायिकाकडून २० हजार रुपयेही स्वीकारले होते. त्यानंतर आरोपी साहिलने व्यावसायिकाकडे १२ हजार रुपयांची मागणी केली. अखेर व्यावसायिकाने याप्रकरणी साकीनाका पोलिसांकडे तक्रार केली.

हेही वाचा- मेधा सोमय्या मानहानी खटल्यात अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

पोलिसांनी याप्रकरणी खंडणीची गुन्हा दाखल करून साकीनाका येथील आझमी कम्पाऊंड परिसरात सापळा रचला होता. आरोपी तेथे रक्कम घेण्यासाठी आला असता साकीनाका पोलिसांच्या पथकाने त्याला रंगेहाथ अटक केली. साकीनाका पोलिसांनी याप्रकरणी आणखी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. खंडणी प्रकरणातील या दोघांच्या सहभागाबाबत पोलीस तपास करीत आहेत.