मुंबईत एका अल्पवयीन मुलीवर टेम्पोमध्ये बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. ११ एप्रिलला ही घटना चेंबूरमध्ये घडली. या प्रकरणी संबंधित मुलीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक तयार केले आहे. त्याचबरोबर मुलीच्या एका मित्रालाही ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आपल्या एका मित्रासोबत १० एप्रिलला गेटवे ऑफ इंडियावर फिरायला गेली होती. परत येताना मित्राच्या दुचाकीतील पेट्रोल संपल्यामुळे त्याने मुलीला चेंबूरजवळ सोडले आणि तेथून तिला चालत घरी जायला सांगितले. मुलगी चालत असताना तिने एका तरुणाला पत्ता विचारला. पत्ता सांगताना अनोळखी तरुणाने मुलीचा विश्वास संपादन करून तिला आपल्या दुचाकीवर बसायला सांगितले. मी तुला घरी सोडतो, अशी थाप तरुणाने मारली. दुचाकीवर बसल्यानंतर त्याने पीडित मुलीला चेंबूर परिसरात खूप वेळ फिरवले आणि मध्यरात्रीच्या सुमारास त्याने तिला पूर्व मुक्त मार्गावरील पुलाखाली उभा असलेल्या टेम्पोमध्ये जबरदस्तीने बसवले. तिथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला. यानंतर आरोपीने तिला धमकावले आणि रस्त्यात सोडून तो तेथून निघून गेला. पीडित मुलगी रस्त्यावर एकटीच फिरत असल्याचे बघितल्यावर पोलिसांनी तिला पोलीस ठाण्यात नेले. तिथे तिने आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाबद्दल पोलिसांना माहिती दिली.
बलात्कार करणाऱ्या तरुणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथक तयार केले असून, चौकशीसाठी त्यांनी मुलीच्या मित्रालाही ताब्यात घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A minor girl raped inside tempo at chembur in mumbai
First published on: 28-04-2016 at 11:33 IST