मुंबईतील विशेष न्यायालयाने हॉटेल व्यावसायिक बी आर शेट्टी यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजन याच्यासह सहा जणांना दोषी ठरवले आहे.छोटा राजनविरोधात सध्या सुरू असलेल्या खटल्यांसाठी स्थापन केलेल्या विशेष न्यायालयाने  हा निर्णय दिला आहे. न्यायालयाने याप्रकरणी आठ वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच या सहाही आरोपींना प्रत्येकी पाच लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुन्हेगारी षडयंत्र रचणे, हत्या, हत्येचा प्रयत्न व २०१२ मध्ये हॉटेल व्यावसायिक बी आर शेट्टी यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी छोटा राजनला दोषी ठरवले गेले आहे. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने १३३२ पानांचे आरोपपत्र दाखल केले होते.

हॉटेल व्यावसायिक बी आर शेट्टी यांच्यावर २०१२ मध्ये गोळीबार करण्यात आला होता. दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या होत्या व हल्लेखोर फरार झाले होते. तर शेट्टी यांच्या खांद्याला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. मात्र तरीही त्यांनी जवळील पोलीस ठाणे गाठले होते व त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

जानेवारी २०१३ मध्ये मुंबई पोलिसांनी याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते. ज्यात छोटा राजनच्या सुचनेवरूनच शेट्टींना गोळी मारण्यात आल्याचे म्हटले होते. छोटा राजन यास २०१५ मध्ये बाली येथून अटक करून भारतात आणले गेले आहे. तेव्हापासून तो दिल्लीतील तिहार तुरूंगात आहे. त्याला मागील वर्षीच पत्रकार जे डे हत्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A special court in mumbai convicts chhota rajan for attempt to murder of hotelier br shetty msr
First published on: 20-08-2019 at 15:54 IST