A threat email warning of a bomb on an IndiGo flight was received at Mumbai airport mumbai print news msr 87 | Loksatta

मुंबई विमानतळावरील इंडिगो विमान बॉम्बद्वारे उडवण्याच्या धमकीचा ईमेल

सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल, प्रशासन आणि पोलिसांची तारांबळ

मुंबई विमानतळावरील इंडिगो विमान बॉम्बद्वारे उडवण्याच्या धमकीचा ईमेल
(संग्रहित प्रातिनिधिक छायाचित्र)

छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावर मुंबई-अहमदाबाद या विमानाला उडवण्याच्या धमकीचा ई-मेल मिळाल्यामुळे शनिवारी प्रशासन आणि पोलिसांची तारांबळ उडाली. यावेळी सर्व यंत्रणांमार्फत तपासणी करण्यात आली. त्यानंतर तासभर विलंबाने म्हणजे रात्री ११ च्या सुमारास विमान अहमदाबादला रवाना झाले.

मुंबई विमानतळ येथे शनिवारी सायंकाळी एक ई-मेल मिळाला. त्यात अहमदाबादला जाणारे ६ ई ६०४५ हे विमान उडवणार असल्याची धमकी देण्यात आली होती. याबाबतची माहिती मुंबई पोलिसांना मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांसह दहशतवाद विरोधी पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक यांना माहिती देण्यात आली. सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या.

सुरक्षा यंत्रणांनी इंडिगो विमानात स्फोटके ठेवण्यात आली आहेत का, याची कसून चौकशी केली. मात्र विमानात अशी कोणतीही वस्तू आढळून आली नाही. मात्र या प्रकारामुळे रात्री साडे नऊ वाजता अहमदाबादला रवाना होणारे विमान रात्री १० वाजून ५८ मिनिटांनी अहमदाबादला रवाना झाले.

त्यापूर्वी मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला पाकिस्तानातील एका क्रमांकावरुन २६/११ सारखा भीषण दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देणारे संदेश आले आहेत. त्याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई अहमदाबाद विमानाबाबत संदेश मिळाला. सोमालिया देशातील मोबाइल क्रमांकावरून हा संदेश पाठवण्यात आला होता. त्यात त्यांच्या देशात घडलेल्या दहशतवादी घटनांच्या अनुषंगाने खबरदारी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सांताक्रुझ येथेही एका व्यक्तीला घातपाताच्या धमकीचा व्हिडिओ कॉल आला होता.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
सप्तशृंगी मंदिराच्या आवारात दसऱ्याच्या दिवशी पशुबळी देण्यास परवानगी; राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती

संबंधित बातम्या

धारावीचं टेंडर विशिष्ट व्यक्तीला मिळावं म्हणून सीमावाद पुढे आणला जातोय का? शरद पवार म्हणाले…
बाळासाहेबांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम जोरदारच करा
खारमध्ये डिलिव्हरी बॉयकडून घरात घुसून महिलेचा विनयभंग, पीडिता म्हणाली, “त्याने माझे…”
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा; इंदू मिलची जमीन राज्य सरकारकडे हस्तांतरित
७ महिन्यांत ३८६ इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Maharashtra Karnataka Dispute : शरद पवारांच्या ४८ तासांच्या अल्टिमेटमवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…
सहायक कक्ष अधिकारी पदाच्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; विशाल चौधरी, शीतल फाळके राज्यात प्रथम
युरिक ॲसिडची पातळी झपाट्याने कमी होईल; फक्त ‘या’ ४ पदार्थांचा आहारात समावेश करा
लग्नानंतर हंसिका मोटवानी पतीसह मुंबईत दाखल; हनिमूनच्या प्रश्नावर लाजत म्हणाली….
Video: रस्त्यावर खड्डा दिसताच या लहान मुलांनी काय केले एकदा पाहाच