गोरेगाव (पूर्व) परिसरातील हनुमान टेकडी लिंक रोडवर मंगळवारी रिक्षाचालकाने मुकेश झांजरे (३२) या तरुणाचा खून केला. याप्रकरणी वनराई पोलिसांनी आरोपी रिक्षाचालक तेजबहाद्दूर सिंग मौर्य याला अटक केली.

हेही वाचा >>>मुंबई : राज्यातील २९ हजार कोटींच्या घोटाळ्यांचा तपास लवकरच! ; सीबीआयला राज्यात तपासाधिकार बहाल

हनुमान टेकडी लिंक रोड येथे मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास रिक्षाचालक तेजबहाद्दूर आणि मुकाश समोरासमोर आले. त्यावेळी मुकेशने तेजबहाद्दूरला चिडवले. त्यामुळे तेजबहाद्दूर प्रचंड चिडला आणि त्याने मुकेशवर चाकूने वार केले. त्यातच मुकेशचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुकेशचा मोठा भाऊ महेंद्रने वनराई पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी तेजबहाद्दूरला अटक केली, अशी माहिती वनराई पोलिसांनी दिली. दरम्यान, यापूर्वीही चिडवाचिडवीवरून उभयतांमध्ये अनेक वेळा वाद झाला होता.