अलीडकडच्या काही दिवसांपासून अनिक्षा आणि अनिल जयसिंघानी प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. डिझायनर असलेल्या अनिक्षाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटी रूपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अनिक्षा आणि अनिल जयसिंघानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणावरून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. त्यावरून ठाकरे गटावरही आरोप करण्यात येत आहेत. २०१५ साली अनिल जयसिंघानीने उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर शिवसेनेत प्रवेश केला होता. २०१४ साली शिवसेनेत प्रवेश केल्यावर अनिल जयसिंघानी २०१५ च्या आसपास फरार झाल्याची माहिती आहे. यावरून ठाकरे गटाला लक्ष्य केलं जात होतं.

Kolhapur A Y Patil
कोल्हापूर राष्ट्रवादीतील वाद उफाळला; हसन मुश्रीफ, के. पी. पाटील यांनी माझे राजकारण संपवण्याचे काम केले – ए. वाय. पाटील कडाडले
narendra modi uddhav thackeray (2)
मोदींनी उद्धव ठाकरेंना पुन्हा साद घातलेली? संजय राऊत म्हणाले, “दिल्लीतल्या त्या बैठकीत पंतप्रधानांनी…”
CM Sukhwinder Singh Sukhu
हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खूंचा राजीनामा? विरोधकांच्या दाव्यावर सुक्खूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
Congress Promising 5000 Rs per month for poor families
“गरीब कुटुंबांना दरमहा ५,००० रुपये देणार”, निवडणुकीआधी काँग्रेसची मोठी घोषणा; म्हणाले, “हे आश्वासन नाही, तर…”

हेही वाचा : धनंजय मुंडे आणि आशिष शेलार यांच्यात विधानसभेत जोरदार खडाजंगी; नेमकं काय घडलं?

याबद्दल विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरेंना विचारलं. यावर आदित्य ठाकरे म्हणाले, “हे सर्वांना माहिती आहे. ज्या जिल्ह्यातून जयसिंघानी येतो, तेव्हा जिल्हाप्रमुख कोण होते? पण मला यात जायचं नाही आहे. कारण, याच्यात सखोल चौकशी झाली पाहिजे. कोणाच्या घरात जाऊ शकतात, हे खूप गंभीर आहे.”

हेही वाचा : “रामदास कदम मुख्यमंत्री झाले, तर ही…”, भास्कर जाधवांनी उडवली ‘त्या’ विधानाची खिल्ली

“..हे एकदा देवेंद्रभाऊंनी तपासून पाहावं”

दरम्यान, शिवसेना ( ठाकरे गट ) उपनेत्या सुषमा अंधारेंनी खासदार श्रीकांत शिंदे यांचं कार्यालय कोणाच्या जागेत आहे? हे तपासण्याची मागणी केली आहे. “उल्हासनगरच्या गोलमैदानात माझा भाचा श्रीकांत शिंदे याचं संपर्क कार्यालय कुणाच्या जागेत आहे हे एकदा देवेंद्रभाऊंनी तपासून पाहावं. श्रीकांत शिंदेचं संपर्क कार्यालय अनिल जयसिंघानीच्या जागेत आहे का? असेल तर कसं?” असा प्रश्न सुषमा अंधारेंनी केला आहे.