मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर बुधवारी दुपारी सात ते आठ गाड्यांचा अपघात झाला असून अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘एक्स्प्रेस वे’वर मुंबईच्या दिशेने येणाऱया मार्गिकेवर बोर घाटाजवळ हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की जवळपास आठ गाड्या एकमेकांवर आदळल्या आहेत. अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दहा जण गंभीर जखमी आहेत. अपघातामुळे मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प पडली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th Nov 2015 रोजी प्रकाशित
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर अपघात, एकाचा मृत्यू
'एक्स्प्रेस वे'वर मुंबईच्या दिशेने येणाऱया मार्गिकेवर बोर घाटाजवळ हा अपघात झाला.
Written by मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड

First published on: 04-11-2015 at 18:09 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accident at mumbai pune expressway