जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटकेत असणाऱ्या एका आरोपीने शुक्रवारी सकाळी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढल्याचा प्रकार घडला. आसिफ शेख असे या आरोपीचे नाव असून त्याला ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यासाठी पोलीस नेत होते. ठाणे टपाल कार्यालयाजवळ येताच त्याने पोलिसांना गुंगारा देत राबोडीच्या दिशेने पळ काढला.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आसिफ शेख या आरोपीस काशिमीरा पोलिसांनी जबरी चोरी तसेच अवैधपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. गेल्या काही दिवसांपासून तो ठाणे कारागृहात बंदिस्त होता. शुक्रवारी सकाळी सुनावणीसाठी त्याला ठाणे सत्र न्यायालयात नेण्यासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांचे एक पथक हजर झाले. नेहमीप्रमाणे त्याचे हात बांधून न्यायालयाच्या दिशेने नेत असताना टपाल कार्यालयालगत पोलीस कर्मचाऱ्यांना धक्का मारून त्याने तेथून पळ काढला.
दरम्यान, आसिफ राबोडीच्या दिशेने पळाल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून दिवसभर त्याचा शोध सुरू होता. या प्रकरणी ठाणे शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा नोंद करण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 1st Dec 2012 रोजी प्रकाशित
पोलिसांना गुंगारा देत आरोपी पळाला
जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटकेत असणाऱ्या एका आरोपीने शुक्रवारी सकाळी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढल्याचा प्रकार घडला. आसिफ शेख असे या आरोपीचे नाव असून त्याला ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यासाठी पोलीस नेत होते.
First published on: 01-12-2012 at 03:13 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused escape from police in thane