गर्दीच्या ठिकाणी प्रतिजन चाचण्या

दिवसभरात ५० हजार चाचण्यांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

संग्रहित छायाचित्र

महापालिकेचा निर्णय; चाचणीस नकार देणाऱ्यांविरोधात कारवाई

मुंबई : वाढत्या रुग्णसंख्येच्या पाश्र्वाभूमीवर मुंबई महापालिके ने गर्दीच्या ठिकाणी प्रतिजन चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. मॉल, पर्यटन स्थळे, रेल्वे स्थानके , एसटी आगार, बाजार, उपाहारगृहे या ठिकाणी करोनाच्या प्रतिजन चाचण्या करण्यात येणार आहेत.

प्रत्येक मॉलमध्ये दर दिवशी ४०० चाचण्या करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, तर मॉलमध्ये खरेदीसाठी येणाऱ्यांना त्यांच्याच खर्चाने करोना चाचणी करावी लागणार आहे. चाचण्या करण्यास किं वा खर्च देण्यास नकार देणाऱ्यांवर साथरोग कायद्यांतर्गत कारवाई के ली जाणार आहे.

दिवसभरात ५० हजार चाचण्यांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मुंबईतील सर्व २४ विभाग कार्यालयांना  दर दिवशी किती चाचण्या के ल्या याचा अहवाल देण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.

मुंबईत एकू ण २७ मॉल आहेत. प्रत्येक मॉलमध्ये ४०० चाचण्यांचे लक्ष्य देण्यात आले आहे, मुंबई सेंट्रल, परेल, बोरिवली, कु र्ला असे चार एसटी डेपो आहेत, तर छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरिवली, लोकमान्य ठिळक टर्मिनस, कु र्ला अशी सात रेल्वे स्थानके  आहेत जिथे परराज्यांतून गाड्या येतात. या ठिकाणी दर दिवशी १००० चाचण्या के ल्या जाणार आहेत.

थेट लस घ्या!

कोविन अ‍ॅपवर लसीकरणासाठी यशस्वी नोंदणी केलेल्या नागरिकांनी लसीकरणाच्या तारखेची वाट न पाहता, नजीकच्या रुग्णालयांमध्ये थेट जाऊन लस घ्यावी, तसेच नोंदणी केली नसेल तरी नजीकच्या रुग्णालयात जाऊन नोंदणी करावी व तेथे लस घ्यावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. मुंबईत महानगरपालिकेच्या तसेच शासनाच्या रुग्णालयांमध्ये नि:शुल्क लस दिली जात आहे. तर सध्या ५९ खासगी रुग्णालयांमध्येही रुपये २५० या दराने सशुल्क लसीकरणाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे.

कुर्ला व बोरिवलीत सर्वाधिक चाचण्या

पालिके च्या विभाग कार्यालयांनी आपल्या हद्दीतील रेल्वे टर्मिनस, मॉल, एसटी डेपो तसेच गर्दीची ठिकाणे येथे चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. यानुसार दिवसभरातील सर्वाधिक चाचण्या या बोरिवलीत आणि कु र्लामध्ये प्रत्येकी ३८००, तर त्याखालोखाल ग्रँट रोडचा भाग असलेल्या डी विभागात ३६०० चाचण्या दर दिवशी कराव्या लागणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Action against those who refuse the decision of nmc akp