मुंबई : कुठलाही गुन्हा दाखल असल्याशिवाय सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) स्वत:हून कारवाई करता येत नाही. मात्र दाखल गुन्ह्यांत ३० लाखांपेक्षा अधिक रकमेचा समावेश असेल तर संचालनालयाला अशा गुन्ह्यांचा काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये चौकशी करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागात ३० लाख रुपये किंवा त्यावरील रकमेबाबत दाखल गुन्ह्यांत सक्तवसुली संचालनालयाने सुमोटो कारवाई सुरू केली आहे.

वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांकडे दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यांत सक्त वसुली संचालनालय स्वत:हून कारवाई करीत नव्हते. परंतु अलीकडे काही प्रकरणात रोख रकमेचा व्यवहार मोठ्या प्रमाणात झाल्याची बाब पुढे आल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने स्वत:हून चौकशी सुरु केली होती. त्यानुसार स्वतंत्र गुन्हा दाखल करुन कारवाई सुरू केली होती. राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात दाखल असलेल्या गुन्ह्यांत काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये आता सक्तवसुली संचालनालयाने स्वत:हून कारवाई करण्याचे ठरविले आहे.

Teacher
२४ हजार शिक्षकांची भरती रद्द, मिळालेला पगारही चार आठवड्यांत परत करण्याचे निर्देश; नेमकं प्रकरण काय?
Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
mumbai high court, Senior Citizens, Maintenance Act, Misuse in Property Disputes, Tribunal s Role Emphasized, property disputes, property disputes in senior citizens,
मालमत्ता वादात कायद्याचा गैरवापर, उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?

हेही वाचा – लोकसभा निवडणुकीसाठी मतदार नाव नोंदणीसाठी यंत्रणा सज्ज, मतदारांसाठी मदत क्रमांक जाहीर

भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल झाल्यास त्यात रोखीचा संशयास्पद व्यवहार ३० लाखांपेक्षा अधिक झाला असल्यास त्याची माहिती संबंधित यंत्रणेने सक्तवसुली संचालनालयाला कळवणे आवश्यक आहे. त्यानंतर संचालनामार्फत चौकशी करुन नंतर काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून कारवाई केली जाते. याशिवाय दाखल गुन्हा वा आरोपपत्रात अशी माहिती आढळली तरी त्याबाबत चौकशी करण्याचे अधिकार संचालनालयाला आहेत. त्या दृष्टीने संचालनालयाने अनेक प्रकरणात चौकशी सुरु केली आहे. मात्र या चौकशीत काळा पैसा आढळला तरच गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली जात असल्याचे या सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा – मुंबई : मेंदूतील गाठ काढून मुलाला जीवदान, नायर रुग्णालायत तब्बल सहा तास शस्त्रक्रिया

विकासक ललित टेकचंदानी यांच्याविरुद्ध मुंबई व नवी मुंबई पोलीस ठाण्यात घरखरेदीदारांना फसविल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात सक्तवसुली संचालनालयाने या गुन्ह्याच्या आधारे चौकशी केली तेव्हा बेहिशोबी नोंदी आढळल्या. त्यानंतर धाडी टाकून ३० कोटींची मालमत्ता तसेच अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली. निर्मल लाईफस्टाईलचे धर्मेश जैन व राजीव जैन यांच्याविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने गुन्हा दाखल करून नंतर तो तपास बंद केला तरी या काळात सक्तवसुली संचालनालयाने छापे टाकून ऐवज जप्त केला होता. नजरचुकीने गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी म्हटले असले करी सक्तवसुली संचालनालयाकडून मात्र तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. दादरमधील प्रसिद्ध साडी व्यावसायिक ‘भारतक्षेत्र’ यावर कारवाई करताना सक्तवसुली संचालनालयाने भोईवाडा पोलीस ठाण्यात २०१९ मध्ये दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने आता कारवाई केली. अशा पद्धतीने आता सक्तवसुली संचालनालयही सक्रिय झाल्याचे या सूत्रांनी सांगितले.