मुंबई : राजकीय पक्ष लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागले असून त्याच वेळी सरकारी यंत्रणाही युद्धपातळीवर निवडणुकीच्या कामाला लागल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदारयादीमध्ये नाव नोंदविण्याची मतदारांना संधी आहे. नाव तपासण्यासाठी किंवा नाव नोंदणीसाठी मदत क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.

आगामी लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधी मुंबई शहर आणि उपनगर या जिल्ह्यांमध्ये नवमतदार नोंदणी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेला अधिक गती देण्यासाठी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष मोहीम राबवली जाणार आहे. यासाठी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्या अध्यक्षतेखाली पालिका मुख्यालयात एक बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, बेस्टचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, स्वीप नोडल ऑफिसर फरोग मुकादम, मुख्य निवडणूक कार्यालय स्वीप समन्वयक, पल्लवी जाधव, मुंबई महानगरपालिकेचे सर्व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

congress in gujarat loksabha
गुजरातमधील काँग्रेसचे ‘जायंट-किलर’ रूपालांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात; भाजपाचं गणित बिघडणार?
Why did Sunetra Pawar say The relationship will improve after the election
सुनेत्रा पवार का म्हणाल्या… निवडणुकीनंतर नात्यात सुधारणा होईल
Lok Sabha polls West Bengal elections
ममतादीदी आणि भाजपा आमनेसामने; एनआयएवरील हल्ल्याचं नेमकं प्रकरण काय?
issue of property tax of Panvel is in discussion in the Lok Sabha elections
लोकसभेच्या निवडणुकीत पनवेलच्या मालमत्ता कराचा मुद्दा चर्चेत 

हेही वाचा – मुंबई : मेंदूतील गाठ काढून मुलाला जीवदान, नायर रुग्णालायत तब्बल सहा तास शस्त्रक्रिया

बैठकीत १८ वर्षांवरील नागरिकांसाठी मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविण्याबाबत चर्चा झाली. तसेच मुंबई महानगरपालिकेकडे असलेल्या उपलब्ध माहितीच्या आधारे अपंग मतदारापर्यंत पोहोचणे, अंथरुणावर खिळून असलेल्या नागरिकांची आरोग्य विभागाकडील उपलब्ध माहिती तपासून मतदार यादीतील नावांची खात्री करून घेणे ही कामे केली जाणार आहेत. तसेच मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी महिला विद्यापीठ, आरोग्य विद्यापीठ आणि होमी भाभा स्टेट विद्यापीठ, यांच्यासह मुंबई शहर आणि उपनगर भागातील खासगी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी समन्वय साधून नवमतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी विशेष नियोजन करण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

नवमतदार नोदणी विशेष मोहिमेसाठी मुंबई महानगरपालिका सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी बैठकीत दिले. मुंबई महानगरपालिकेशी संलग्नित सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संलग्न आरोग्य सेविका, अशा सेविका, महिला स्वयंसहाय्यता गट, महिला बचत गट, स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान वस्ती पातळीवरील कार्यरत संस्था व त्यांचे स्वयंसेवक आणि नागरी सुविधा केंद्रांच्या माध्यमातून ही कामे केली जातील. तसेच सर्व संबंधितांनी निवडणुकीच्या कामाला अधिक प्राधान्य द्यावे, असे निर्देशही बैठकीत देण्यात आले.

हेही वाचा – भविष्य निर्वाह निधी, ग्रॅज्युईटीचा भरणा न केल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये रोष

मदत क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदारयादीमध्ये नाव नोंदवता यावे, मतदारयादीतील आपले नाव तपासून घ्यावे, आणि आपले नाव नसेल तर मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in / Voter Helpline Mobile App / मतदार मदत क्रमांक १८००२२१९५० वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे.