‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये सहभागी दुकानांत उपस्थिती

मुंबई : दूरचित्रवाणीवर सध्या गाजत असलेल्या ‘स्वामिनी’ या मालिकेत रमाच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ऋ ग्वेदी प्रधान हिला ‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये भेटता येणार आहे. शुक्रवारी, ३१ जानेवारीला विलेपार्ले येथील ‘व्ही. एम. मुसुळूणकर ज्वेलर्स’, ‘जानकी ज्वेलर्स’, ‘वाकडकर ज्वेलर्स’ या दुकानांना ऋ ग्वेदी सायंकाळी ६ वाजता भेट देणार आहे. यावेळी ग्राहकांना ऋ ग्वेदीशी संवाद साधता येईल.

‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’च्या सहाव्या पर्वाला दमदार सुरूवात झाली आहे. नेहमीच्या खरेदीबरोबरच बक्षिसाचा दुहेरी आनंद मिळवून देणारा असा हा महोत्सव असून यात बृहन्मुंबई परिसरातील अनेक गृहोपयोगी वस्तूंच्या शोरूम्सनी सहभाग घेतला आहे. या महोत्सवात ग्राहकांना पारितोषिके  जिंकण्याची संधी मिळणार आहे.

महोत्सवाच्या अखेरीस सोडतीद्वारे पहिल्या भाग्यवान ग्राहकाला ‘के सरी टूर्स’कडून सहलीचे पॅके ज हे पारितोषिक  दिले जाणार आहे. १६ फेब्रुवारीपर्यंत हा खरेदी महोत्सव सुरू राहणार आहे. ‘वामन हरी पेठे ज्वेलर्स’ प्रस्तुत आणि ‘रिजेन्सी ग्रुप’ यांच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’साठी ट्रॅव्हल पार्टनर ‘के सरी टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स’ आहेत. या महोत्सवासाठी ‘वाकडकर ज्वेलर्स’, ‘सी. ए. पेंडुरकर ज्वेलर्स’, ‘एम. व्ही. पेंडुरकर’, ‘अपना बाजार’, ‘राणेज पैठणी’ हे सिल्व्हर पार्टनर आहेत.‘स्वरा पैठणी’, ‘शिंदे शूज’ आणि ‘असमेरा फॅशन’ गिफ्ट पार्टनर तर, ‘साने केअर’ हार्ट केअर पार्टनर आहेत. ‘एम. के. घारे ज्वेलर्स’, ‘व्ही. एम. मुसुळूणकर ज्वेलर्स’ आणि ‘पांडुरंग हरी वैद्य ज्वेलर्स अ‍ॅण्ड सन्स’ हे फेस्टिव्हलचे गोल्ड पार्टनर आहेत. तसेच  ‘एस. ए. इनामदार’, ‘पांडुरंग हरी वैद्य’ आणि ‘व्ही. पी. बेडेकर अ‍ॅण्ड सन्स’ हे पॉवर्ड बाय पार्टनर आहेत.

कसे सहभागी व्हाल?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये सहभागी असलेल्या दुकानांमध्ये ५०० रुपयांपेक्षा अधिक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना देयकासोबत एक कूपन दुकानदार देतील. तसेच दागिन्यांच्या ३ हजार रूपयांपेक्षा अधिक खरेदीवर एक कूपन दिले जाईल. कू पन भरून दुकानात असलेल्या ‘लोकसत्ता’च्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहे. अर्धवट माहिती भरलेले कूपन स्वीकारले जाणार नाही. ‘ड्रॉपबॉक्स’मध्ये जमा होणाऱ्या कू पनमधून भाग्यवान विजेत्यांची निवड के ली जाईल व त्यांची नावे ‘लोकसत्ता मुंबई’मधून प्रसिद्ध के ले जाईल. अटी लागू आहेत.